वेतनवाढीसाठी बनावट प्रमाणपत्र दिल्याने लिपिकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:28 AM2019-10-03T11:28:30+5:302019-10-03T11:28:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वेतनवाढीसाठी बनावट एमएससीआयटी देऊन शासनाची फसवणूक करणा:या कनिष्ठ सहायकाविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वेतनवाढीसाठी बनावट एमएससीआयटी देऊन शासनाची फसवणूक करणा:या कनिष्ठ सहायकाविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े शहरातील आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला आह़े
सत्तरसिंग चिंधा वसावे रा़ आडदा ता़ निझर जि़ तापी हे नंदुरबार शहरातील आदिवासी विकास महामंडळ मर्यादित उपप्रादेशिक कार्यालयात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत असताना ऑगस्ट 2016 मध्ये वेतनवाढीसाठी आवश्यक कागदपत्र म्हणून एमएससीआयटीचे प्रमाणपत्र सादर केले होत़े हे प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्य तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले होत़े याठिकाणी प्रमाणपत्राची कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे समोर आले होत़े यातून तंत्रशिक्षण विभागाने प्रमाणपत्र अवैध असल्याचे नंदुरबार उपप्रादेशिक अधिकारी यांना लिखित स्वरुपात कळवले होत़े दरम्यान सत्तरसिंग वसावे हे सेवानिवृत्त झाले होत़े याप्रकरणी कार्यालयीन चौकशी करण्यात येत होती़ चौकशीअंती कनिष्ठ सहायक वसावे हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले होत़े
याबाबत प्रतिभा दिगंबर पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सत्तरसिंग वसावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार हे करत आहेत़