वाळू वाहतूकदारांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:37 PM2020-07-23T12:37:48+5:302020-07-23T12:38:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवैधरित्या जिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध तालुका व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Crimes filed against sand transporters | वाळू वाहतूकदारांवर गुन्हे दाखल

वाळू वाहतूकदारांवर गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवैधरित्या जिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध तालुका व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने कारवाई केली जात असली तरी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री आठ वाजता समशेरपूर कारखान्याजवळ रेती वाहतूक करणाºया वाहनांना अडविण्यात आली. त्यांची तपासणी केली असता त्यात विनापरवाणगी वाळू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश काढले असतांनाही त्याचे उल्लंघन करून गुजरातमधून ही वाळू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यावरून शेख एजाज शेख मुस्ताक रा.हरसूल, ता.औरंगाबाद, शेख समीर मतुलाल शेख रा.औरंगाबाद, मोबान अय्यूब शेख रा.फुलंब्री, जि.औरंगाबाद, मोहम्मद अय्यूब रफीक, मोहम्मद शोएब रा.मलकापूर, जि.बुलढाणा यांच्याविरुद्ध पोलीस नाईक गुलाब तेली यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय ८ जुलै रोजी करण चौफुुली येथे ट्रक (क्रमांक एमएच ४१-जी.७२८३) अडवून तपासणी केली असता त्यात तब्बल २० मे.टन वाळू आढळून आली. त्यासंदर्भात कुठलीही अधिकृत पावती किंवा कागदपत्रे आढळून आले नाहीत.
याशिवाय जिल्हाधिकाºयांचा आदेशाचे देखील उल्लंघन केल्याने मंडळ अधिकारी राहुल देवरे यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलीस ठाण्यात सचिन समाधान निकम, रा.मांजरे, ता.मालेगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नाईक करीत आहे.

Web Title: Crimes filed against sand transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.