मारहाणीसह जबरी चोरी व अॅट्रोसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:33 PM2018-10-04T12:33:05+5:302018-10-04T12:33:10+5:30
चौपाळे तोडफोड : परस्परविरोधी गुन्हे दाखल, घटनास्थळी बंदोबस्त कायम
नंदुरबार : मंगळवारी कृष्णा पार्क मध्ये झालेल्या तोडफोडप्रकरणी परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तोडफोड व जबरी चोरीच्या गुन्ह्यात 44 जणांना आरोपी करण्यात आले आहे तर दुसरा गुन्हा अॅट्रोसिटी व विनयभंगाचा असून दोघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत पहिली फिर्याद योगेंद्र काशिनाथ दोरकर यांनी दिली. कृष्णा पार्क व रिसोर्ट बंद करण्याच्या मागणीसाठी जमावाने आपल्याशी व आपल्या प}ीशी हुज्जत घालून मारहाण केली. तसेच रिसोर्टची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केली. प}ीच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन व गल्ल्यातून 1350 रुपये काढून घेतले. दुचाकीवर रॉकेल टाकून जाळून टाकल्याच्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून सागर सुधाकर धामणे, दिलीप भगवान चित्रकथे, विठ्ठल गुलाब पटेल, पुंजू देवराम कुमावत, योगेश श्रीपत पाटील, लिमजी पाटील, शरद पटेल, भरत पटेल, चंपालाल पाटील, राजाराम पाटील, तुकाराम हरदास, रतिलाल बेलदार, सुरेश बेलदार, योगेश बेलदार, सुशिलाबाई बेलदार, धोंडीबाई हरदास, वामन महाजन, पुंडलीक महाजन, प्रल्हाद बेलदार, गणेश महाजन, भरत चौधरी, धर्मा चौधरी, मक्कन पटेल, संदीप बेलदार, विश्वास बेलदार, रवींद्र बेलदार, मोहन पटेल, शाना कोळी, संदीप बेलदार, सोनुअप्पा माळी, अनिल चौधरी, विठ्ठल चौधरी, सुनील चौधरी, गुलाब माळी, सतिष माळी, कैलास माळी, राजू माळी, पप्पू माळी, छोटू माळी, बन्सी पटेल, रवींद्र चौधरी, काळू माळी, जिजाबाई बेलदार सर्व रा.चौपाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा
चौपाळे येथील 55 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार योगेंद्र दोरकर व मनिषा दोरकर यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाने नोटीसा दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाण्याला आडकाठी करू नका असे सांगितले. त्याचा राग येवून दोरकर दाम्पत्याने शिविगाळ केली. जातीवाचक बोलून अपमानीत केले. फिर्यादी सोबत असलेल्या महिलेचा हात धरून मारहाण करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून योगेंद्र दोरकर व मनिषा दोरकर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती कायदा कलम व विनयभंगान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक रमेश पवार व सहायक पोलीस निरिक्षक गणेश पवार करीत आहे.