जात पडताळणीसाठी होणा-या गर्दीत कोविड नियमांची गच्छंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:08 PM2020-12-28T12:08:58+5:302020-12-28T12:09:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील विभागीय जात पडताळणी कार्यालयालय व सामाजिक न्याय भवनातील जिल्हा जात पडतळणी समिती कार्यालयात ...

In the crowd for caste verification, Kovid rules | जात पडताळणीसाठी होणा-या गर्दीत कोविड नियमांची गच्छंती

जात पडताळणीसाठी होणा-या गर्दीत कोविड नियमांची गच्छंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  शहरातील विभागीय जात पडताळणी कार्यालयालय व सामाजिक न्याय भवनातील जिल्हा जात पडतळणी समिती कार्यालयात सध्या ग्रामपंचायत निवडणूक लढवणा-या इच्छुकांची गर्दी होत आहे. दरदिवशी होत असलेल्या या गर्दीत कोविड नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. 
खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने अनुसुचित जमाती राखीव जागांसाठी निवडणूक लढवू इच्छिणारे सध्या कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. यात प्रमुख प्रमाणपत्र म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी होत आहे. नंदुरबार येथे अनुसुचित जमाती जात पडताळणीचे विभागीय कार्यालय असल्याने याठिकाणी २३ डिसेंबरनंतर गर्दी होत आहे. नाताळच्या एक दिवसाची सुटी वगळता शनिवार आणि रविवारी जात पडताळणी समितीचे कामकाज सुरु होते. यावेळीही मोठ्या प्रमाणात या आवारात गर्दी झाली होती. या गर्दीला आवर घालणे मुश्किल असल्याने अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवत एक खिडकी योजनांसारखे प्रस्ताव घेणे सुरु ठेवले होते. महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असले तरी एकाच पॅनलच्या दोन ते तीन महिला एकाचवेळी पुढे येत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. संबधित विभागाचे कर्मचारी सांगूनही योग्य त्या उपाययोजनांना प्राधान्य दिले गेले नसल्याचे दिसून आले. यात विद्यार्थी वर्ग व पालकांची गळचेपी होत होती.  

विद्यार्थ्यांना प्राधान्य
१२ वीनंतर पुढच्या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट व इतर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रस्तावही दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत यासाठी समितीकडून कामकाज सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी होणा-या गर्दीतही या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. 

उमेदवारांची रेटारेटी
शेजारीत धुळे व जळगाव जिल्ह्यातून येणारे अनेक जण सोबत दोन-चार कार्यकर्ते आणत असल्याने याठिकाणी अनावश्यक गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. प्रस्ताव दाखल करतानाही सोबतचेच पुढे-पुढे करत असल्याने कोविड नियमांचा भंग होत आहे. काही तास या आवारात थांबणारे मिळेल त्या जागी बसून राहत असल्याचेही दिसून आले आहे. 

प्रशासनातर्फे दक्षता
दक्षता म्हणून जात पडताणी समितीने पोलीस बंदोबस्त तैनात करुन होणा-या गर्दीला आवर घालण्याचा प्रयत्न केला होता. कर्मचारी कोरोना उपाययोजना म्हणून सॅनेटायझर व वेळ पडल्यास ग्लाेव्हजही वापरत आहेत. देणा-यांनाही याबाबत सूचना केली जाते.  
रोज २०० अर्ज
गेल्या २३ डिसेंबरपासून जात पडताळणी समितीकडे किमान दीड हजार प्रस्ताव ग्रामपंचायत निवडणूक लढवणा-यांनी दाखल केले आहेत. सोबत ५०० च्या जवळपास विद्यार्थ्यांनीही अर्ज केले आहेत. रविवारी दिवसभरात १३० ग्रामपंचायत इच्छुकांनी अर्ज दाखल केले.  

अधिकारीच झाले त्रस्त 
दरम्यान समितीचे सहायक संचालक एस.ई.भालेकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कार्यालयात संपर्क केला असता, ग्रा.प निवडणूकीसाठी जात पडताळणी प्रस्ताव देणा-या काहींसाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी यांचे फोन येत असल्याने अधिकारी कर्मचारी इतर कामे त्यांची कामे करत असल्याने बोजा पडत असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: In the crowd for caste verification, Kovid rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.