पाटी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:46 PM2018-04-04T12:46:09+5:302018-04-04T12:46:09+5:30
यात्रोत्सव : बैलबाजारात लाखोंची उलाढाल, अडीचशे वर्षाचा इतिहास
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पाटी मातेच्या यात्रोत्सवाला मंगळवारी भाविकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली़ सकाळपासूनच भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़
अडीचशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील पाटी माता देवीच्या यात्रोत्सवात भाविकांकडून पुजा-अर्चा करण्यात येत असत़े भाविकांच्या श्रध्दास्थान असलेल्या या यात्रेला पेशवे काळापासून निधी देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत़े या यात्रोत्सवाला शेतकरी वर्गाची दरवर्षी मोठय़ा संख्येने उपस्थिती असत़े मातेचे दर्शन घेतल्यानंतर शेतीच्या उत्पन्नाला बरकत येत असल्याची श्रध्दा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत असत़े त्यामुळे नंदुरबारसह गुजरात, मध्यप्रदेशातून मोठय़ा संख्येने भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात़ दरम्यान, 31 मार्च पासून सुरु झालेला हा यात्रोत्सव सात एप्रिल र्पयत सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आल़े यात्रोत्सवाबरोबरच या ठिकाणी बैलबाजारही भरविण्यात येत असतो़ यात लाखो रुपयांची उलाढाल होत असत़े
या ठिकाणी जेवढे जास्त तगतराव तेवढी जास्त उत्साहात यात्रा रंगत असत़े यंदाच्या यात्रोत्सवात 12 तगतराव असणार आह़े त्यामुळे याचे भाविकांमध्ये मोठय़ा प्रमाणात आकर्षण असत़े दरम्यान, यात्रोत्सवात मोठ-मोठे झुले, पाळणे आदी खेळणी ठेवण्यात आली आह़े त्यामुळे लहान मुलांमध्येही याचे आकर्षण दिसून येत आह़े या माध्यमातूनही यात्रोत्सवात मोठी उलाढाल होत असत़े या ठिकाणी सकाळी, सायंकाळी व रात्री दर्शनासाठी मोठय़ा संख्येने गर्दी होत असत़े दुपारी उन्हामुळे भाविकांची संख्या कमी असत़े