वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:14 PM2018-07-22T13:14:02+5:302018-07-22T13:14:09+5:30
सुविधांचा अभाव : 40 लाखांचा निधी उपलब्ध मात्र कामांना सुरूवात नाही
तळोदा : तालुक्यातील सातपुडय़ाच्या पर्वत रांगेतून उगम पावणारा व जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला वाल्हेरी येथील धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. दरम्यान सुविधा नसल्याने मोठय़ा प्रमाणावर गैरसोय वाढली आहे.
वाल्हेरी हे ठिकाण तालुक्यातून जाणा:या ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या उत्तरेस सातपुडय़ाच्या पायथ्याशी आहे. येथे जाण्यासाठी सोमावल गावावरून जाता येते. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी या ठिकाणीचे धबधबे ओसंडून वाहत आहेत.
पावसाचे प्रमाण कमी असल्याचा या धबधब्यावर कुठलाही परिणाम होत नाही. येथे चहुबाजूने वेढलेल्या हिरव्यागार टेकडय़ा, वृक्ष, वेली या निसर्गाच्या सानिध्यामुळे या धब धब्याचे सौदर्य अजूनच खुलून दिसत आहेत. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटकांचीही मोठय़ा प्रमाणात गर्दी होतांना दिसून येत आहे. येथील वाल्हेरी माता मंदिर परिसरापासून थोडय़ाच अंतरावर असलेल्या द:या-खो:यातून कोसळणारे धबधबे, नागमोडी वाटा, कच्चा रस्ता, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकडय़ा, असे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक मेजवानीच ठरत आहेत. त्यामुळे पर्यटक येथे मोठय़ा प्रमाणात हजेरी लावत आहेत.
या पर्यटन स्थळांचा सर्व सुविधा-युक्त विकास व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून पर्यटन प्रेमींकडून होत आहे. या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. येथे आलेल्या पर्यटकांना वाहने उभी करण्यापासूनच समस्येला सुरूवात होत आहेत. परिणामी वाल्हेरीच्या विकासासाठी 40 लाखांचा निधी उपलब्ध करूनही येथे येणा:या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी वेळोवेळी मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अधिका:यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.