काळमदेव यात्रोत्सवात भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:47 PM2019-12-02T12:47:24+5:302019-12-02T12:47:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : नंदुरबार तालुक्याच्या हद्दीवर असणा:या काळमदेव यात्रेत यावर्षीही हजारो भाविकांनी हजेरी लावून काळमदेवाचे दर्शन घेतले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शनिमांडळ : नंदुरबार तालुक्याच्या हद्दीवर असणा:या काळमदेव यात्रेत यावर्षीही हजारो भाविकांनी हजेरी लावून काळमदेवाचे दर्शन घेतले. मात्र ऐन यात्रोत्सवात पावसाने अल्पशी का होईना हजेरी लावल्याने हजारो भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले.
मार्गशिर्ष महिन्यात पंचमीला काळमदेव महाराजांची यात्रा भरते. शनिमांडळपासून सात किलोमीटर अंतरावर असणारे हे देवस्थान जंगलात असून, काळमदेव महाराजांचे देवस्थान एका उंच डोंगरावर आहे. डोंगराच्या पायथ्याची यात्रा भरविण्यात येवून यावर्षीही लहान व्यावसायिकांपेक्षा मोठय़ा व्यावसायिकांनीही हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी यात्रेत लहान व्यावसायिक मोठी हॉटेल्स, पालख्या, मौत का कुआ यांच्यासह भांडय़ांची दुकाने, रेडिमेड कपडे, मसाल्याची दुकाने आदींची भर पडल्याने यात्रेचा विस्तार झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, सकाळच्या वेळेस चांगले उन पडत होते. मात्र निसर्गाने 11 वाजेनंतर रंग बदलल्याने पावसाळी वातावरण तयार झाले होते. शेवटी दुपारी एक-सव्वा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावलीच. परिणामी हजारो भाविकांचा हिरमोड झाला. पावसाच्या हलक्या सरी किमान 10 मिनिटार्पयत बरसल्याने भाविक व्यावसायिकांची काहीशी गैरसोय झाली. त्यातच मान-मानता, नवस फेडण्यासाठी स्वयंपाक करणा:या मंडळींना मोठी समस्या निर्माण झाली. पाऊस येण्याची कोणतीही शाश्वती नसल्याने पावसापासून बचावासाठी काहीही साधने नव्हती. मात्र काही काळानंतर उघडीप दिल्याने स्वयंपाक करणा:यांच्या जीवात जीव आला. अध्र्या तासाच्या अंतराने पावसाने दोन वेळा हजेरी लावल्याने काहीशी निराशेनंतर दुपारी दोन वाजेनंतर पावसाळी वातवरण निवळून ऊन पडल्याने यात्रेने पूर्ववत वेग घेतला.
जमिनीपासून हजारो फुट उंचीवर डोंगराच्या शिखरावर काळमदेव महाराजांचे देवस्थान आहे. देवस्थानार्पयत जाण्या-येण्यासाठी पाय:यांचे काम जवळ-जवळ पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची सोय गेल्या तीन ते चार वर्षापासून करण्यात आहे. देवस्थानासमोरील जागेतही दर्शनाच्या वेळी भाविकात झुंबड होत असल्याने अपघात होऊ नये म्हणून आजू-बाजूला खिडक्या बसविण्यात आल्या आहेत. पाण्याची टाकीही बांधली आहे. भाविकांसाठी पाण्याची सोयही करण्यात आल्याने दर्शनार्थ भाविकांची गैरसोय दूर झाली आहे.