फिरते वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:17 PM2019-12-08T12:17:01+5:302019-12-08T12:17:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात मुंबईहून आलेले फिरते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात मुंबईहून आलेले फिरते वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी चिंचपाडा परिसरातील सुमारे १७०० विद्यार्थी व १०० शिक्षकांनी हजेरी लावली.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथील फिरते म्युझियम एका मोठ्या बसमध्ये सूत्रबद्धरित्या मांडण्यात आले होते.अतिशय आकर्षक अशा या बसमध्ये विविध प्रकारचे जिवाष्म, मानव उत्क्रांती व प्राण्यांचे परिस्थितीशी अनुकूलन साधण्याची प्रवृत्ती याची सुंदर, शास्त्रशुद्ध व मॉडेल्स रुपात रचना करण्यात आली होती. या बससोबत मुंबईहून आलेल्या अमित पाले, चिन्मय, नेल्सन व मयूर यांनी या संग्रहालयातील सर्व वस्तूंची वैज्ञानिक माहिती दिली. परिसरातील वनवासी विद्यालय, इमानुवेल पब्लिक स्कूल, एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद मराठी शाळा, उर्दू शाळा, आदिवासी माध्यमिक विद्यालय या शाळांमधील सुमारे १७०० विद्यार्थी व १०० शिक्षकांनी या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. विद्यालयाचे शिक्षक अनिल लोहार यांनी हे फिरते म्युझियम उपलब्ध होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी प्राचार्य भरत निकुंभ, पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे, रामकृष्ण सोनवणे, विज्ञान मंडळ प्रमुख प्रमोद चिंचोले, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.