उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा केळी पिकाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:56 PM2018-04-29T12:56:32+5:302018-04-29T12:56:32+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 29 : सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने केळी पिकाला फटका बसत आहे. शेतक:यांनी जीवापाड जपलेल हे पीक सध्या होरपळत असून, त्याचा उत्पनावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे.
शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी परिसरात केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. सध्या बाजारात आंबे फळांची आवक जास्त असल्याने केळी पिकाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे. दरम्यान उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने उष्णतेच्या झळा केळी पिकाला उध्वस्त करू पाहताहेत. सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसर्पयत राहत असल्याने उष्ण वारे, तीव्र सूर्यप्रकाश यामुळे केळीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या फळाची साल पिवळी पडणे, फणीतून केळी गळून पडणे, उष्ण हवेमुळे पाने फाटने हे दुष्परिणाम पहावयास मिळत आहेत.
दिवसरात्र परिश्रम करून जीवापाड जपलेले हे पीक असे वाया जाईल अशी चिंता शेतक:यांकडून व्यक्त होत आहे. आधीच पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच उत्पादनात घट झाल्यास उत्पादन खर्च निघेल की नाही, ही समस्या शेतक:यानं समोर उभी आहे.
पीक संरक्षणासाठी शेतक:यांकडून उपाय योजना
केळी पिकाला वाढते तापमान घातक असले तरी योग्य उपाय योजना केल्यास पिकाचे संरक्षण होऊ शकते. त्यामुळे काही शेतक:यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. केळी बागेच्या अवती भवती प्रतिबंधक झाडे लावण्याची पद्धत सुरू असून, केळीच्या घडाला गोणपाट, पांढरे कापड, प्लास्टिक पिशवी लावण्यात येत आहे.