शहादा येथे हातमजुरी करणा:या ग्राहकाला सव्वा लाखांचे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:54 PM2018-03-07T12:54:55+5:302018-03-07T12:54:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात हातगाडीवर मजुरी करणा:या इसमाला वीज वितरण कंपनीने सुमारे एक लाख 31 हजाराचे घरगुती वापराचे वीज बिल पाठविल्याने वीज कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
शहरातील सालदारनगर परिसरात युवराज पानपाटील हे झोपडीत राहून हातगाडीवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात कुठल्याही प्रकारचे विजेवर चालणारे उपकरणे नाहीत. वीज वितरण कंपनीचे रीतसर मीटर बसवून नियमित येणारे वीज बिल भरायचे. मात्र फेब्रुवारी महिन्यात वीज कंपनीने चक्क एक लाख 25 हजार रुपये बिल पाठविले.
जानेवारी 2018 ला 500 रुपये कंपनीचे वीज बिल आल्याने सदर ग्राहकाने ते भरलेही. सव्वा लाखाच्या बिलाची तक्रार संबंधित अधिका:यांकडे केल्याने 500 रुपये भरण्याची सक्ती केली व पुढील महिन्यात वाढीव जास्तीचे वीज बिल येणार नाही, असे सांगितले. मात्र सव्वा लाखांवरुन चालू महिन्यात एक लाख 31 हजारांचे वीज बिल वीज कंपनीने पाठविले. चुकीचे बिल एकदा येऊ शकते मात्र दुस:यांदा पुन्हा वाढीव बिल पाठविणे चुकीचे व प्रिंट मिस्टेक म्हणता येणार नाही. सदर ग्राहकाचे वीज मीटर रिडींगनुसार चालू महिन्यात 100 युनिट फिरले आहे. बंगल्यात एसी, कुलरमध्ये राहणा:यांना एवढे बिल येत नाही मात्र झोपडीत राहणा:यांना एक लाख 31 हजाराचे बिल येत हा एक चर्चेचा विषय ठरला असला तरी गरीब काबाडकष्ट करणा:या इसमांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. झोपडी व हातगाडी विकूनही एवढी रक्कम भरू शकणार नाही, अशी कैफियत युवराज पानपाटील यांनी मांडली.