सिलिंडरच्या आवाजाने क्षणभर घबराट

By admin | Published: March 9, 2017 01:02 AM2017-03-09T01:02:37+5:302017-03-09T01:02:37+5:30

धडगाव येथील घटना : वेल्डिंगच्या दुकानातील घटना; जखमींमध्ये बाप-लेक

The cylinder's awkward moment panic | सिलिंडरच्या आवाजाने क्षणभर घबराट

सिलिंडरच्या आवाजाने क्षणभर घबराट

Next

धडगाव : शहरातील शहादा रस्त्यावर एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन तिघे जखमी झाल्याची घटना घटना घडली़ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे धडगाव शहरात एकच खळबळ उडाली़
धडगावातील शहादा रस्त्यावर  रमेश नारसिंग पावरा (४५) यांचे गॅस वेल्डिंगचे दुकान आहे़ या ठिकाणी त्यांना त्यांची मुले मुले दिनेश रमेश पावरा (१५) व दिलवर रमेश पावरा (१४) हे दोन्ही मदत करतात़ बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे रमेश पावरा यांनी दुकान उघडून विविध कामांना सुरुवात केली़ या वेळी त्यांच्याकडे असलेल्या कार्पेट सिलिंडरचा अचानक स्फोट झाला़ हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, दुकानातील तिघे सिलिंडरमधून बाहेर पडलेल्या विस्तवासारख्या पदार्थामुळे भाजले गेले़ मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरून जाणारी वाहने थांबली, तर रोषमाळ परिसरातील नागरिकही या ठिकाणी धावून मदतीसाठी गेले़ स्फोटानंतर सिलिंडर सुमारे २० फुटांपेक्षा अधिक उंच हवेत उडून रस्त्यालगत असलेल्या नालीत पडले़ नागरिकांनी या ठिकाणी माहिती घेत तत्काळ १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली होती़ मात्र रुग्णवाहिका येत नसल्याने नागरिकांनी खासगी वाहनातून तिघा जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येऊन तिघांना तातडीने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले़ नंदुरबार सामान्य रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे़
    (वार्ताहर)

रुग्णवाहिकेतील डॉक्टरची मनमानी
धडगाव येथे झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी रुग्णवाहिका पाचारण करूनही आली नाही़ ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याचे दिसून आले़ हे डॉक्टर शहादा येथून रुग्णवाहिकेत बसणार असल्याची माहिती रुग्णाच्या नातलगांना देण्यात आली़ संबंधित १०८ रुग्णवाहिके कार्यरत डॉक्टरकडून हा प्रकार सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत होती़

Web Title: The cylinder's awkward moment panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.