बाबा गरीबदासांच्या जयघोषाने दुमदुमली नंदनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:05 PM2018-03-01T12:05:45+5:302018-03-01T12:05:45+5:30
जय समाधी : मोठय़ा संख्येने भाविकांची गर्दी, सायंकाळच्या मिरवणुकीने वेधले लक्ष
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 1 : करके सेवा गुरु दर की अमर वो आज बन गये, त्याग संसार को खुद आज वो भगवान बन गये, बाबा गरीबदास की जय हो़़अशा घोषणांनी येथील बाबा गरीबदास नगर पारिसरातील गुरु जो दर मंदिर दणाणले होत़े बाबा गरीबदास साहिब यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी मोठय़ा संख्येने बुधवारी भाविकांनी हजेरी लावली होती़
गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबार येथील गुरु जो दर मंदिरात सतगुरु महाराज 108 बाबा गरीबदास साहिब यांचा वार्षिक मेला उत्सवाचे आयोजन बाबा गरीबदास साहिब सेवा मंडळाकडून करण्यात आले आह़े चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी या उत्सवाची समाप्ती करण्यात आली़ गेल्या चार दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े त्यात, हवन पूजन, अखंड पाठ, साहिब का आरंभ, प्रवचन आणि सत्संग, ध्वजवंदना, भोग साहिब, पल्लव साहिब आदी विविध कार्यक्रमांचा सहभाग होता़
भाविकांची मांदियाळी.
बाबा गरीबदास यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांकडून मोठय़ा संख्येने गर्दी करण्यात आली होती़ बाबांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ त्या सायंकाळर्पयत कायम होत्या़ तसेच बापू श्री 1008 बाबा गुरुदासराम साहेब समाधीस्थळी भाविकांनी चादर चढवण्यासाठीही मोठय़ा संख्येने गर्दी केली होती़
विविध ठिकाणच्या भाविकांची अजेरी.
बाबा गरीबदास साहिब यांच्या वार्षिक महोत्सवानिमित्त इंदोर, रायपूर, भोपाल, अलीगढ, जळगाव, धुळे आदी विविध ठिकाणाहून भाविकांनी हजेरी लावली होती़ भाविकांसाठी बाबा गुरुदास नगर येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आह़े गेल्या चार दिवसांपासून भाविकांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही या ठिकाणी होत आह़े या ठिकाणी बहुतेक भाविक हे खान्देशा बाहेरुनदेखील आलेले होत़े त्यांची संपूर्ण व्यवस्था बाबा गरिबदास साहिब सेवा मंडळाकडून करण्यात आली आह़े बुधवारी मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होत़े त्याच प्रमाणे आपल्या इच्छेनुसार भाविकांनी या वेळी दान केल़े