‘गोविंदा रे गोपाला’च्या जयघोषात दहीहंडी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:56 AM2019-08-26T11:56:51+5:302019-08-26T11:56:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शहरातील सुभाष चौकात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शहरातील सुभाष चौकात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या उत्सवात तालीम संघाचे नऊ पथक सहभागी झाले होते.
शांतीसागर कै. सुपडू मराठे (पैलवान) यांच्या जय बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी नऊ वाजेपासूनच शहरातील विविध व्यायाम शाळेतील कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत सुभाष चौकात येत होते. गोविंदा रे गोपाळाच्या गजरात थरवर थर रचण्यात येवून हंडी फोडण्याचा प्रय} विविध तालीम संघाचे कार्यकर्ते करीत होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थितीतांचा जल्लोष अधीकच वाढत होता. दुपारी साडेबारा वाजेर्पयत हा उत्सव रंगला होता.
सहभागी झालेल्या तालीम संघांमध्ये श्री सावता माळी व्यायामशाळा, विर शैव लिंगायत गवळी व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम शाळा, मा भगवती पुत्र व्यायाम शाळा, श्री शबरी व्यायामशाळा, सार्वजनिक व्यायाम शाळा, जय संताजी व्यायाम शाळा, श्री वायुपुत्र व्यायाम शाळा, श्री रोकडेश्वर व्यायाम शाळा इत्यादी व्यायाम शाळेचा समावेश होता. या व्यायाम शाळेतील गोविंदा पथकानी ढोल-ताशांच्या गजरात आणि गोविंदाच्या जय घोषात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.
सहभागी सर्व तालीम संघांना दहीहंडी फोडण्यासाठी संधी देण्यात आली. त्यापैकी चार संघांचे गोविंदा दहीहंडी फोडण्यात यशस्वी झाले.
गोकुळाष्टमी निमित्ताने हा कार्यक्रम शेखर मराठे, संजय भदाने, जितेंद्र मराठे, दिनेश कुंकारी, बलराज राजपूत यांनी आयोजित केला होता. पोलीस निरीक्षक नंदवाळकर हे यावेळी उपस्थित होते. सुभाष चौकात रंगलेल्या दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.