दहीहंडीचा थरावर थर, नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:12 PM2019-08-25T12:12:12+5:302019-08-25T12:12:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणीत करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणीत करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदां उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षीततेचे अनेक नियम असून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या काही वर्षात अनेकजण त्यातून जायबंदी झाले आहेत. तथापि, दुर्घटना टाळण्यासाठीच दही हंडा करा परंतु नियम पाळा असे सांगण्याची वेळ आली आहे.
दंही हंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरूणाईत दिसून येतो. मोठय़ा शहरांच्या तुलनेत नंदुरबारमध्ये दही हंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान मोठी आठ ते दहा मंडळे उत्साहात सहभागी होतात. दही हंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा या निमित्ताने असते. नंदुरबारात खास असे गो¨वंदा पथक किंवा गोपिका पथक नसले तरी स्थानिक तालीम संघातील युवकांचे गटच ते फोडत असतात. यासाठी मोठय़ा प्रमाणात इनामही लावले जातात. मात्र, शहरात फारशी सुरक्षीतता बाळगली जात नाही. त्यामुळे छोटे अपघात घडत असतात. त्यामुळे सर्वानीच सतर्कता आणि सुरक्षीतता बाळगली तर हा उत्सव आणखी आनंदात आणि मोठय़ा जल्लोषात साजरा करता येऊ शकतो.
नंदुरबारमध्ये बजरंग व्यायाम शाळेतर्फे दरवर्षी दहीहंडी साजरा केली जाते. गेल्या काही वर्षापासून करण चौफुलीवर देखील शिवसेनेतर्फे मोठी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. सुभाष चौकात साजरा होणारी दहीहंडी ही गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. या¨ठकाणी पारंपरीक पध्दतीने दही हंडी होते. विविध तालीम संघांचे पथक या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात. नंदुरबारात जास्तीत जास्ती चार ते पाच थर लागतात. त्यापेक्षा जास्त थर लागत नाहीत. करण चौफुलीवरील दहीहंडीही गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झाली आहे. येथेही मोठी गर्दी होत असते.