केळीचे 200 घड कापून नुकसान
By admin | Published: April 1, 2017 12:29 AM2017-04-01T00:29:35+5:302017-04-01T00:29:35+5:30
कुढावद शिवारातील घटना : एक लाखाचे नुकसान, शेतमालकाच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांचा प्रय} फसला
शहादा : तालुक्यातील कुढावद शिवारात तीन एकर क्षेत्रातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे 200 केळीचे घड कापून नुकसान केल्याची घटना घडली. मात्र संबंधित शेतमालकाच्या सतर्कतेमुळे हे घड चोरून नेण्याचा चोरटय़ांचा प्रय} फसला. पोलिसांनी चोरटय़ांचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.
याबाबत वृत्त असे की, कुढावद, ता.शहादा येथील नरोत्तम रतिलाल पाटील व भरत रतिलाल पाटील यांनी पिंपळोद-कुढावद रस्त्यालगत असलेल्या शेतात तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. त्यांच्या केळीचे घड तयार झाले असून दोन दिवसांपूर्वीच एका व्यापा:याशी माल विक्रीचा व्यवहार झाला होता. एक-दोन दिवसात केळीचे घड तोडण्याबाबत व्यापारी व शेतकरी यांच्यात ठरले होते. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नरोत्तम पाटील हे शेतातून घरी आले. त्यानंतर रात्री नऊ वाजता वीजपुरवठा सुरू होतो म्हणून पिकांना पाणी देण्यासाठी ते परत शेतात आले. पाटील हे साडे नऊ वाजेच्या सुमारास लाईट व मोटार सुरू करून पिकांना पाणी देत होते. त्यावेळी त्यांनी झाडांवरील केळीचे घड कापल्याचे निदर्शनास आले. शेतातून रस्त्यार्पयत सुमारे 200 पेक्षा जास्त केळीचे घड कापून ठेवलेले होते. सध्या केळीला 1500 रुपयांचा भाव असल्याने सुमारे एक लाख रुपये किमतीचा हा माल होता. एक-दीड तासातच 200 केळीचे घड कापून रस्त्यावर व्यवस्थित ठेवण्यात आलेले होते. त्यावरून हे चोर 10 ते 15 जण असण्याची शक्यता आहे. चोरांनी पद्धतशीरपणे नियोजन केले होते. हे केळीचे घड वाहून नेण्यासाठी वाहनही आणले असावे, असा अंदाज आहे.
शहादा तालुक्यात शेतातून शेती साहित्याची चोरी व तयार झालेला शेतमाल चोरून नेण्याच्या घटना ह्या कायमच्या झाल्या आहेत. याबाबत शेतक:यांनी पोलिसांना वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही या चोरटय़ांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कुढावद येथे केळीचे घड कापून चोरून नेण्याचा चोरांचा प्रय} शेतक:याच्या सतर्कतेमुळे फसला असला तरी या चोरटय़ांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.
शहादा तालुक्यातील शेतातून शेती साहित्याची चोरी, शेतमालाची चोरी या घटना नेहमीच घडतात. म्हसावद-पिंप्री परिसरात तर चक्क विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरी करताना चोरटय़ांना शेतक:यांनी रंगेहात पकडले होते. शेतमालाची व शेती साहित्याची चोरी करण्यासाठी चोरटय़ांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. गुरुवारी रात्री कुढावद शिवारातील केळीच्या शेतातून सुमारे 200 केळीचे घड कापून ते रस्त्यार्पयत आणून ठेवण्यात आले होते. वाहनाद्वारे हे केळीचे घड लंपास करण्याचा चोरटय़ांचा प्रय} असावा. मात्र संबंधित शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात आल्याने चोरटय़ांचा हा प्रयत्न फसला असला तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी चोरटय़ांचा वेळीच बंदोबस्त करण्याची अपेक्षा त्रस्त शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.