विनापरवाना कापूस खरेदीमुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:55 PM2017-11-12T12:55:35+5:302017-11-12T12:55:35+5:30
मापात पाप : जिल्ह्यातील विविध भागात बोगस व्यापा:यांचा सुळसुळाट
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सीसीआयने जिल्ह्यात सुरू केलेले कापूस खरेदी केंद्र बंद केल्याने शेतक:यांनी खरेदी परवाना नसलेल्या व्यापा:यांना कापूस विक्री करण्याचा सपाटा लावला आह़े चार हजार 600 रूपये भाव सांगून ‘मापात पाप’ करणा:या या कापूस खरेदीमुळे बाजार समितीचा महसूल बुडत आह़े
जिल्ह्यात गेल्या महिन्यात परवानाधारक कापूस व्यापा:यांनी चार हजार 611 रूपयांचा प्रती क्विंटल दर कापसाची खरेदी सुरू केली होती़ ही खरेदी सुरू झाल्याच्या दुस:या दिवशी सीसीआयने खरेदी सुरू केली़ यामुळे आनंदीत झालेल्या शेतक:यांनी पळाशी ता़ नंदुरबार येथील कापूस खरेदी केंद्रात कापूस आणण्यास सुरूवात केली होती़ हे सर्व सुरळीत सुरू असतानाच सीसीआयने खरेदी थांबवण्याचा निर्णय घेत खरेदीतून माघार घेतली होती़ या परिणाम म्हणजे खरेदी केंद्राकडे शेतक:यांनी पाठ फिरवली असून चार परवानाधारक व्यापा:यांच्या कापूस आवकमध्ये प्रचंड घट आली आह़े दिवसाला किमान 900 क्विंटल होणारी कापूस आवक 400 क्विंटलवर येऊन ठेपली आह़े याचा फायदा ग्रामीण भागात खाजगी आणि परवाना नसलेले व्यापारी घेत असून मोठय़ा गावांमध्ये लावण्यात येणा:या वजन काटय़ांमध्ये फेरफार करत शेतक:यांचा कापूस खरेदी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथून दरदिवशी चार ट्रक कापूस घेऊन मध्यप्रदेशात रवाना होत आहेत़ मध्यप्रदेशातील खेतिया येथील विविध जिनिंग मिलमध्ये कापूस दर पाच हजार रूपयांर्पयत असल्याने व्यापारी तेथे कापूस विक्री करत आहेत़