दरवाजे बनविण्याच्या फॅक्टरीच्या आगीत पावणेदोन कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:23 PM2018-03-16T12:23:03+5:302018-03-16T12:23:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील सावखेडा शिवारातील उमा ईम्पॅक्टर या फ्लॅश डोअर तयार करणा:या फॅक्टरीला गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागून सुमारे एक कोटी 80 लाख रुपये नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत तयार व कच्चा माल, दरवाजे बनविण्याची मशिनरी व मोठे पत्र्याचे शेड जळून खाक झाले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
शहादा शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर सावखेडा शिवारात पूव्रेस तीन महिन्यापूर्वीच येथील पटेल फर्निचरचे मालक हरीश देविसीभाई पटेल यांनी उमा ईम्पॅक्टर फॅक्टरी दोन एकर क्षेत्रात उभारली आहे. एक एकर क्षेत्रात फॅक्टरची भव्य पत्र्याचे शेड व त्यात फ्लॅश डोअर तयार करण्यासाठी यंत्रसामुग्री होती. त्याला लागून दोन खोल्यांमध्ये फॅक्टरीचे कार्यालय होते. त्यात दोन संगणक, इतर साहित्य, फर्निचर व महत्त्वाचे दस्तऐवज होते. दरवाजे तयार करण्यासाठी दोन दिवसापूर्वीच तीन ट्रक प्लायवूड व इतर साहित्य आणण्यात आले होते. फॅक्टरीत सुमारे 40 लाख रुपये किमतीचे तयार केलेले फ्लॅश डोअर व एक मोटारसायकल गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत हे सर्व साहित्य खाक झाले. पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते.
या फॅक्टरीच्या काही अंतरावर वीज उपकेंद्र आहे. गेल्या दोन दिवसापूर्वीच फॅक्टरीतील विद्युत प्रवाह दुरुस्तीबाबत लेखी तक्रार केल्याचे समजते. या घटनेसंदर्भात पोलिसांत अगAीउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.