घरात घुसून नुकसान करणा:या दोघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:24 PM2019-08-29T12:24:19+5:302019-08-29T12:24:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घरात घुसून नुकसान करणा:या दोघांना अक्कलकुवा न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली़ 2016 मध्ये ही घटना ...

Damage to a Home: Punish both | घरात घुसून नुकसान करणा:या दोघांना शिक्षा

घरात घुसून नुकसान करणा:या दोघांना शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरात घुसून नुकसान करणा:या दोघांना अक्कलकुवा न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली़ 2016 मध्ये ही घटना घडली होती़  
जुलै 2016 मध्ये हसीनाबी शकील मक्राणी रा़ संजयनगर यांच्या घरात इम्रान ऊर्फ डेंग्यू अफसर पठाण व जावेद गफ्फार पठाण या दोघांनी अनधिकृतपणे प्रवेश करत मुलाला मारहाण करण्याची धमकी दिली होती़ दरम्यान दोघांनी हसीनाबी व त्यांच्या दोघा मुलींना धक्काबुक्की करत घराचे कौले तोडून नुकसान केले होत़े याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ दोघांविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश येलवे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होत़े अक्कलकुवा न्यायालयात न्यायमूर्ती ए़डी़करभजन यांच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला़ साक्षी पुरावे तपासून दोघांना 500 रुपये दंड व न्यायालय उठेर्पयत शिक्षा झाली़ सरकार पक्षातर्फे अॅड़ अजय सुरळकर यांनी काम पाहिल़े 
 

Web Title: Damage to a Home: Punish both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.