प्रकाशा चौफुली ठरतेय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:05 PM2018-06-13T13:05:51+5:302018-06-13T13:05:51+5:30

Dangerous is light due to light | प्रकाशा चौफुली ठरतेय धोकेदायक

प्रकाशा चौफुली ठरतेय धोकेदायक

Next

प्रकाशा : बेशिस्त वाहतुकीमुळे येथील चौफुलीवर वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने प्रकाशेकर त्रस्त झाले आहेत. येथील बसथांब्याजवळ चार रस्ते एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रवाशांनाही जीव मुठीत धरून वाहन पकडावे लागते. उपाययोजनांअभावी ही चौफुली मृत्यूचा सापळा ठरली आहे.
प्रकाशा येथील बसथांब्याजवळ नंदुरबार, तळोदा, शहादा व प्रकाशा गावातून येणारे रस्ते आहेत. त्यामुळे याठिकाणी लहान-मोठय़ा वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यात बेशिस्तपणे वाहने चालविणा:यांची भर पडून इतर वाहनचालक व प्रवाशांना ते त्रासदायक ठरतात. प्रकाशा गावातून अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्ग जात असल्याने अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. एस.टी. बसेसही या चौफुलीवरच थांबत असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबावे लागते. बस पकडण्याच्या प्रय}ात अनेकवेळा प्रवाशांना वाहनांची धडक बसून जखमी झाल्याच्या घटना नेहमी घडतात. एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी ही चौफुली म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे. त्यामुळे शहादा आगार प्रमुखांनी येथे भेट देऊन बसेस थांबण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याची गरज आहे.
प्रकाशा येथील बसथांबा परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहने निघण्यासाठी जागा कमी आहे. वाहने काढण्याच्या कारणावरून याठिकाणी वादही होतात. चौफुली परिसरात कायमस्वरुपी वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. म्वाहतूक पोलीस कर्मचारी नेमवा, असा ठरावही ग्रामसभेत झाल्याची माहिती सरपंच भावडू ठाकरे यांनी दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या चौफुलीवर बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी व प्रवाशांचे होणारे हाल थांबविण्यासाठी संबंधितांनी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Dangerous is light due to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.