हवेच्या द्रोणीय भागामुळे नंदुरबारातील तापमानात घट.
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: May 24, 2018 12:57 PM2018-05-24T12:57:06+5:302018-05-24T12:57:06+5:30
संतोष सूर्यवंशी ।
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी तापमानाचा पारा 42 अंशाच्या खाली येण्यास तयार नव्हता़
दरम्यान, समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर तयार झालेल्या हवेच्या द्रोणीय भागामुळे पुढील एक ते दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े यामुळे खान्देशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आह़े
दरम्यान, या पावसाचे प्रमाण अत्यंल्प राहणार असल्याने यामुळे कुठल्याही प्रकारे शेतीचे नुकसान होणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े उत्तर-पूर्व मध्यप्रदेश ते मध्य कर्नाटकार्पयत या वा:यांचा प्रभाव असल्याने याचा परिणाम खान्देशासह, मराठवाडा व विदर्भातही जाणवत आह़े दरम्यान, या द्रोणीय वा:यांमुळे तापमानात घट झाली असली तरी हे वातावरण निवळल्यावर पुन्हा तापमान वाढीची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आह़े
बुधवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान निर्माण झाले होत़े यामुळे सकाळी काहीसे अल्हाददायक वातावरण निर्माण झाले होत़े दुपारी दीड वाजेर्पयत ढगाळ वातावरण कायम होत़े त्यानंतर काही प्रमाणात उन्हाचा पारा जाणवू लागला़ परंतु ऐरवीसारखा चटके देणारे तापमान बुधवारी नव्हत़े त्यामुळे सतत आग ओकत असलेल्या सूर्यापासून नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळाला़ हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी समुद्रसपाटीपासून साधारणत एक किलोमीटर अंतरावर वाहत असलेल्या वा:यांचा वेध घ्यावा लागत असतो़ सध्याच्या परिस्थतीत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर अंतरावर हवेचा द्रोणीय भाग निर्माण झाला आह़े द्रोणीय भागामध्ये हवा चक्राकार किंवा गोलाकार आकाराने फिरत असत़े यात हवेचा दाब कमी असतो़ अशा वातावरणामुळे ढगाळ हवामान निर्माण होऊ शकत़े असे वातावरण 72 तास कायम राहिल्यास प्रभावीत क्षेत्रामध्ये तुरळक पावसाचीही शक्यता निर्माण होत असत़े
पश्चिमेकडून येताय वारे
अरबी समुद्रावर मोठय़ा प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिमेकडून मोठय़ा प्रमाणात वेगवान वारे वाहत आहेत़ या सर्व खगोलीय परिस्थितीमुळे वातावरणात वेगवान बदल होत आहेत़ अजून काही दिवस हा कमी दाबाचा पट्टा राहिल्यास तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आह़े
रात्री वा:यांच्या गतीत वाढ
दिवसा आग ओकणा:या सूर्यामुळे सर्वसामान्य बेहाल झाले असले तरी, रात्रीच्या वेळी मात्र साधारणात ताशी 35 ते 40 प्रतिकिमी वेगाने वारे वाहत असल्याने यामुळे नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळत आह़े रात्रीच्या वेळी प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत़ या वा:यांचा वेग नुकसान करणारा नसला तरी, मध्यरात्री काहीशी थंडी जाणवत असत़े त्यामुळे उकाडय़ापासून आराम मिळावा यासाठी नागरिक घरांच्या छतावर झोपण्यास प्राधान्य देत असतात़
यंदा केरळात वेळेत मान्सून धडकणार असला तरी अंदमानात मान्सून वारे अडकून पडल्यास पावसाळा आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ हे सर्व वेळेवर निर्माण होणा:या खगोलिय परिस्थिती अवलंबून असल्याचेही कुलाबा वेधशाळेतर्फे सांगण्यात आले आह़े लवकरात लवकर मान्सून यावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े