उघडय़ावर फेकलेल्या वेस्टेज बायोमेडिकलमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:09 PM2019-07-03T12:09:58+5:302019-07-03T12:10:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील पुलाला लागून जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्टेज) उघडय़ावर टाकल्याने आरोग्यास धोका ...

Dangerous Westage Biomedical Dangers Danger | उघडय़ावर फेकलेल्या वेस्टेज बायोमेडिकलमुळे धोका

उघडय़ावर फेकलेल्या वेस्टेज बायोमेडिकलमुळे धोका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील पुलाला लागून जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्टेज) उघडय़ावर टाकल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उघडय़ावर हा जैविक कचरा टाकणा:यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चिंचपाडा गावाशी परिसरातील 20 ते 25 गावातील नागरिकांचा नियमित संपर्क येतो. येथे वैद्यकीय सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, एक धर्मदाय रुग्णालय व गावात आठ खाजगी दवाखाने आहेत. त्यांच्यामार्फत गाव व परिसरातील गावातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात येते. रुग्णांवर उपचार केल्यानंतर औषधांच्या बाटल्या, सिरींज यासह इतर बायोमेडिकल वेस्टेज उघडय़ावर फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आले आहे. चिंचपाडा येथील नाल्यावरील प्रस्तावीत पुलाला लागून हे बायोमेडिकल वेस्टेज उघडय़ावर टाकण्यात आले असून हवा व पाण्यामध्ये वाहून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने  याबाबत दखल घेऊन हे बायोमेडिकल वेस्टेज फेकणा:यांचा शोध घ्यावा व यापुढे असा प्रकार होणार नाही यासाठी संबंधित ताकीद देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Dangerous Westage Biomedical Dangers Danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.