सारंगखेडय़ात आजपासून दत्तप्रभूंचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:15 AM2018-12-22T11:15:50+5:302018-12-22T11:15:54+5:30

सारंगखेडा : एकमुखी दत्तमंदिरासाठी संपूर्ण राज्यात तर अश्व बाजारासाठी देशभर परिचित असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आह़े यानिमित्त ...

Dattaprabhu's Yatra from today in Sarangkheday | सारंगखेडय़ात आजपासून दत्तप्रभूंचा यात्रोत्सव

सारंगखेडय़ात आजपासून दत्तप्रभूंचा यात्रोत्सव

Next


सारंगखेडा : एकमुखी दत्तमंदिरासाठी संपूर्ण राज्यात तर अश्व बाजारासाठी देशभर परिचित असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आह़े यानिमित्त येथे हजारो भाविक पहिल्या दिवशी दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आह़े
यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी पालखी सोहळा झाला़ प्रारंभी महाआरती करण्यात येऊन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला़ आरतीनंतर पालखीत दत्त प्रभूंची मूर्ती ठेऊन बाजारपेठ, पोलीस ठाणे या मार्गाने शोभायात्रा सुरु करण्यात आली़ यात शेकडोंच्या संख्येने भाविकांचा सहभाग होता़ रात्री 12 वाजता पालखी मंदिरावर आली़ यानंतर पूजन करण्यात पुन्हा गाभा:यात मूर्ती विराजमान करण्यात आली़ यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मंदिर परिसर आणि मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आह़े मंदिर प्रशासनाकडून महिला आणि पुरुष अशी दर्शनासाठी स्वतंत्र रांग तयार करण्यात येणार आह़े यासाठी बॅरिकेटींग करण्यात आले असून नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आह़े भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सीसीटीव्ही आणि पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली आह़े मंदिर ट्र्स्टचे अजरुन पाटील, सचिव भिक्कन पाटील व उपाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्यासह संचालक मंडळाकडून शुक्रवारी विविध व्यवस्थांचा आढावा घेण्यात येऊन सुधारणा करण्यात आल्या़
सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुशिलाबाई मोरे, ग्रामसेवक पी़डी़पाटील यांच्यासह कर्मचा:यांनी यात्रेतील सुविधांचा आढावा घेतला़ ग्रामपचायतीकडून भाविकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून स्वच्छतेवर भर दिला आह़े
पर्यटकांचे आगमन
अश्वबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रोत्सवात येणा:या पर्यटकांसाठी यंदा 12 डिसेंबरपासून चेतक फेस्टीवलला सुरुवात करण्यात आली आह़े यासाठी तापी नदीपात्राला लागून टेंट व्हिलेजची उभारणी करण्यात आली आह़े यासाठी पर्यटकांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आह़े त्याचसोबत विविध सुविधाही उभारण्यात आल्या आहेत़ चेतक फेस्टीवलअंर्गत यंदा महिनाभर विविध कार्यक्रम होणार आहेत़ समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम होणार आहेत़ पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे फेस्टीवलचा आढावा घेत आहेत.
पोलीस दल सज्ज
यात्रोत्सवात येणा:या हजारो पर्यटक आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने तया:या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात येथे 2 पोलीस उपनिरीक्षक, 60 पोलीस कर्मचारी, 72 गृहरक्षक दलाचे जवान, श्वान पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे 3 कर्मचारी, 12 महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत़ सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह कर्मचारी याठिकाणी तळ ठोकून आहेत़
तात्पुरत्या दवाखान्याची सोय
भाविकांची मोठय़ा प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता सारंगखेडा येथे आपत्कालीन स्थितीसाठी शहादा, तळोदा, शिरपूर, नंदुरबार, दोंडाईचा येथील अगिअशामक विभागाचे बंब तैनात करण्यात येत आहेत़ तसेच आरोग्य विभागाकडून 7 वैद्यकीय अधिकारी, 13 आरोग्यसेविका, 9 आरोग्य सहायक, 3 सुपरवायझर, 108 आणि 102 क्रमांकाच्या प्रत्येकी 2 रुग्णवाहिका मंदिर परिसरात तैनात करण्यात येणार आहेत़ आरोग्य सेवांची माहिती देण्यासाठी स्टॉल तसेच फेस्टीवलच्या प्रशासकीय कार्यालयात तात्पुरता दवाखाना सुरु करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य नियंत्रण अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितल़े

Web Title: Dattaprabhu's Yatra from today in Sarangkheday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.