भरदिवसा घरफोडय़ांचे सत्रामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:17 PM2019-12-03T12:17:48+5:302019-12-03T12:17:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरदिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोडी आणि तीन ठिकाणी झालेल्या प्रयत्नामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले ...

Day-to-day burglary sessions create an atmosphere of fear among citizens | भरदिवसा घरफोडय़ांचे सत्रामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

भरदिवसा घरफोडय़ांचे सत्रामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरदिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोडी आणि तीन ठिकाणी झालेल्या प्रयत्नामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ज्ञानदिप सोसायटी भागात चोरटय़ांनी दोन घरांमधून लाखोंचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, शहर पोलिसांची निष्क्रीयता पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे. 
नंदुरबारात चो:यांचे सत्र सुरूच आहे. आता चोरटय़ांनी दिवसा या घरफोडी करून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ज्ञानदिप सोसायटी भागात दोन घरे फोडण्यात आली. प्लॉट नंबर 52 मध्ये राहणारे दगडू    रेवा नागरे हे नातेवाईकांच्या    लगAासाठी कुटूंबासह गेले होते. भर रस्त्यावरील बंद घर हेरून चोरटय़ांनी दुपारी दीड ते तीन वाजेच्या दरम्यान दरवाजाचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. 
घरातील कपाटातून त्यांनी 63 हजार रुपये किंमतीचा 21 ग्रॅम सोन्याचा नेकलेस आणि 11 हजार रुपये रोख असा एकुण 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. नागरे कुटूंबिय घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत  दगडू नागरे यांच्या फिर्यादीवरून     गुन्हा दाखल करण्यात आला        आहे.
हाकेच्या अंतरावरच दुसरी घटना घडली. प्लॉट नंबर 60 मध्ये राहणारे सतिष विश्वास पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा देखील तोडलेला आढळून आला. पाटील हे देखील लगAासाठी बाहेरगावी गेले होते. 
चोरटय़ांनी घरातील 21 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने व पाच हजार रुपये रोख असा एकुण 26 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. याबाबत सतिष पाटील यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात   आला. 
दोन्ही घटनांचा तपास फौजदार क्षिरसागर करीत आहे. दोन्ही ठिकाणी बेडरूम, किचन मधील सामान चोरटय़ांनी अस्तावस्त केलला होता. नागरे यांच्या घरात पोलिसांना फिंगर प्रिंट आढळून आले.  श्वान पथकाला पाचारण केले असता श्वान परिसरातच घुटमळले. दरम्यान, रविवारी लगAतिथी मोठी असल्याने अनेक घरे बंद होती. चोरटय़ांनी इतरही दोन, तीन ठिकाणी चोरीचा प्रय} केल्याचे समोर येत आहे. 
काही प्रत्यक्षदर्श्ीच्या म्हणण्यानुसार, चोरटे चारचाकी वाहनातून आले होते. त्यापैकी तीनजण कारमध्ये बसून राहत होते तर एकजण चोरी करीत होता. त्यामुळे माहिती असलेल्यांकडूनच हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.


चोरीच्या या घटनांना शहर पोलिसांची निश्क्रियता कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. धुळे रोडवरील ज्ञानदीप सोसायटीसह या भागात यापूर्वी असलेल्या पोलीस निरिक्षक हे नियमित रात्रीची गस्त सक्तीची करीत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या भागात रात्रीची गस्तच बंद झाली आहे. पोलीस निरिक्षकांची निष्क्रियतेमुळे गस्त बंद झाली आहे. पूर्वी प्रमाणे रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच दिवसा साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवून फेरीवाल्यांवर लक्ष ठेवावे अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 
या भागात फेरीवाल्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. विविध वस्तू विक्रीसाठी दिवसभर फेरीवाले या भागात फिरत असतात. घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजताच ब्लँकेट विक्री करणारा या भागात आला होता. एवढय़ा सकाळी फेरीवाला कसा असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे पोलिसांनी फेरीवाल्यांवरही लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. 
 

Web Title: Day-to-day burglary sessions create an atmosphere of fear among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.