दे ऱे़़निसर्गा मुसळधार पावसाचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:05 PM2019-07-01T12:05:11+5:302019-07-01T12:05:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस बरसत असताना नंदुरबार जिल्हा मात्र पावसाच्या प्रतिक्षेत आह़े यामुळे 80 ...

De Riesnisarga's heavy rain donation | दे ऱे़़निसर्गा मुसळधार पावसाचे दान

दे ऱे़़निसर्गा मुसळधार पावसाचे दान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस बरसत असताना नंदुरबार जिल्हा मात्र पावसाच्या प्रतिक्षेत आह़े यामुळे 80 क्षेत्रावर पेरण्या रखडल्या असून सर्वमुखी निसर्गाने द्यावे पावसाचे दान ही एकच मागणी आह़े जिल्ह्यात पावसाने हजेरी लावावी यासाठी गावोगावी रामधून, हरीपाठ आदींसह पारंपरिक उपक्रम राबवून पावसाची आळवणी केली जात आह़े  
जून महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापर्पयत सरासरी 352 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े यथातथा कोसळलेल्या या पावसामुळे जमिनीची वाफही होऊ शकली नसल्याने कोरड आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत़ एकीकडे पावसाने खंड दिला असून दुसरीकडे जमिनीतील भूजल पूर्णपणे खालावून गावोगावी पाणीटंचाई अधिक तीव्र होत आह़े दरम्यान जिल्ह्यात 3 हजार 500 हेक्टर क्षेत्रात बागायती कापसाची पेरणी झाल्याची नोंद आह़े कृषी विभागाकडे निर्धारित असलेल्या 2 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांच्या पेरणीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ विभागाच्या म्हणण्यानुसार जमिन अद्यापही कोरडी असल्याने पेरणीतून लाभ होणार नसल्याने शेतकरी पेरण्या टाळत आहेत़ तप्त असलेल्या जमिनीत बियाणे खराब होण्याचे शक्यता असल्याने शेतकरी धोका पत्करण्यास तयार नाहीत़ 
दुबार पेरणीचे संकट 
जून महिना संपुन देखील पावसाने दडी मारल्याने काही ठिकाणच्या शेतक:यांवर दुबार दुबार पेरणीचे संकट गडद झाले आह़े शहादा तालुक्याच्या पूर्व भागातील मंदाणेसह गावांमध्ये तसेच नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात शेतक:यांनी कापूस, मूग, भूईमूग आणि मका पेरणी केली होती़ परंतु पावसाने येथे अद्यापही हजेरी न लावल्याने दुबार पेरणीचे संकट आह़े गेल्या तीन दिवसांपासून शहादा तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे वातावरण आह़े परंतू पाऊस वारंवार हुलकावणी देत आह़े नदी-नाल्यांमध्ये पाणी नसल्याने गुरांच्या पाण्याचा प्रश्न कायम आह़े  
गेल्या 10 दिवसांपूर्वी जिल्ह्यात जागोजागी पावसाने हजेरी लावल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ यातून अनेकांनी घरगुती बियाणे पेरणी केली होती़ पाऊस लांबल्यास या शेतक:यांना पुन्हा बियाणे खरेदी करावी लागणार असून आर्थिक संकट वाढणार आह़े शेतक:यांनी बँक, पतपेढी, सोसायटी अशा ठिकाणांहून कर्ज घेत पेरणीची तयारी केली आह़े परंतू पाऊस नसल्याने हा खर्चही वाया जाण्याची शक्यता आह़े 

पावसाचे आवाहन करणारे पारंपरिक उपक्रमही ग्रामीण भागात सुरु आह़े रविवारी शिंदे ता़ नंदुरबार येथे महिलांनी 24 तास रामधून उपक्रमास सुरुवात केली़ पावसासाठी असलेल्या या अखंड रामधूनचा समारोप सोमवारी करण्यात येणार आह़े या उपक्रमात परिसरातील महिलांनी सहभाग नोंदवला होता़ दरम्यान गावोगावी धोंडी काढून पाणी मागण्यासह गावदैवतांना नवस करुन पूजनाचे कार्यक्रम होत आह़े 

रविवारी शहादा शहरात पावसाने हजेरी लावली. ऊन्हाच्या तडाख्याने बेजार झालेल्या शहादेकरांना सुमारे तासभर झालेल्या पावसाने दिलासा मिळाला. तासभर झालेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला होता़ शहरासोबतच तालुक्यातील अनरद, पुसनद, वरुळ-कानडी, कु:हावद, कवठळ या गावांमध्ये पावसाची नोंद झाली़ पावसामुळे परिसरातून वाहणारे नदी-नाले दुथडी भरुन वाहत होत़े  या भागातील अनेक केटी वेअर बंधा:यांना दरवाजे नसल्याने पाणी वाहून गेल़े यापरिसरात पाऊस कोसळत असताना तालुक्याच्या उत्तर भागातील म्हसावद परिसरातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत हवालदिल झाले आहेत़ पेरणीसाठी शेताची मशागत करून तयार आहे. बि-बियाणे विकत घेवून पडली आहेत. सधन शेतकरी वर्गाने ठिबकच्या बळावर कापूस, केळी, पपईची लागवड केली असली तरी कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने ही पिकेही धोक्यात आहेत़ 

रविवारी दुपारी 2 वाजेर्पयत नंदुरबार जिल्ह्यात केवळ 52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े यात सर्वाधिक 37 मिलीमीटर पाऊस हा धडगाव तालुक्यात कोसळला आह़े नवापुर तालुक्यात 12 तर अक्कलकुवा तालुक्यात 3 मिलीमीटर पावसाने हजेरी लावली होती़ जिल्ह्यात आजअखेरीस 7़1 टक्के पावसाची नोंद असून या पावसामुळे जमिनीची तहान भागलेली नसल्याने शेतीकामांना वेग येऊ शकलेला नाही़ 
 

Web Title: De Riesnisarga's heavy rain donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.