गोरंबा घाटात प्रवासी जीप उलटून एक ठार, दहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:45 PM2018-12-02T12:45:22+5:302018-12-02T12:45:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : प्रवासी वाहतूक करणारे वाहन गोरंबा, ता.धडगाव घाटात उलटून एकजण जागीच ठार तर दहाजण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : : प्रवासी वाहतूक करणारे वाहन गोरंबा, ता.धडगाव घाटात उलटून एकजण जागीच ठार तर दहाजण किरकोळ जखमी झाल्याची घटना 30 रोजी घडली. रात्री उशीरा धडगाव पोलिसात नोंद करण्यात आली.
सुरुपसिंग सिंगा वसावे (48) रा.गोरंबा असे मयताचे नाव आहे. धडगाव-गोरंबा दरम्यान प्रवासी वाहतूक केली जाते. दुर्गम व घाट रस्ता असल्यामुळे एस.टी.जात नाही. परिणामी खाजगी वाहनांचाच आसरा घ्यावा लागतो.
शुक्रवारी प्रवासी वाहतूक करणारे वाहन (क्रमांक एमएच 18- एन 6470) गोरंबा शिवारातील कोनबिरार घाटात आले असता घाटाचा अंदाज न आल्याने उलटले. त्यात बसलेले सुरुपसिंग वसावे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गिरणाबाई वसावे, मसालीबाई वसावे, गुलामसिंग पाडवी, भिका पाडवी, माकल्या वळवी, निशा डेमश्या वळवी, वसंत वळवी, फत्तेसिंग वळवी, कविता वळवी व कालशा पाडवी सर्व रा. गोरंबा, ता.धडगाव हे जखमी झाले. जखमींना तातडीने धडगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत सोन्या रुपसिंग वसावे यांनी फिर्याद दिल्याने चालक सुभाष कागडा पाडवी याच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मनोरे करीत आहे.