म्हशीच्या लाथेमुळे अधिका-याचा मृत्यू, विहिरीत पडून कठडा लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 05:44 AM2017-11-24T05:44:48+5:302017-11-24T05:45:15+5:30

नंदुरबार : टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग वनसिंग पाडवी (५७) यांचा मृत्यू झाला. वाण्याविहीर येथे मंगळवारी रात्री ही विचित्र दुर्घटना घडली.

The death of the officer due to the crushing of buffaloes, got drunk in the well | म्हशीच्या लाथेमुळे अधिका-याचा मृत्यू, विहिरीत पडून कठडा लागला

म्हशीच्या लाथेमुळे अधिका-याचा मृत्यू, विहिरीत पडून कठडा लागला

Next

नंदुरबार : टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग वनसिंग पाडवी (५७) यांचा मृत्यू झाला. वाण्याविहीर येथे मंगळवारी रात्री ही विचित्र दुर्घटना घडली.
पशुसंवर्धन विभागाकडून सध्या पाळीव गुरांचे टॅगिंग करण्यात येत आहे़ गुरांच्या कानाला यूआयडी क्रमांक असलेला बिल्ला लावून टॅगिंग केली जात आहे़ यासाठी मंगळवारी सायंकाळी वाण्याविहीर (ता़ अक्कलकुवा) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहायक पशुधनविकास अधिकारी दशरथसिंग पाडवी हे धीरज क्षत्रिय यांच्याकडे गेले होते़ त्यांच्या म्हशींना टॅग लावण्याचे काम सुरू असतानाच एका म्हशीने त्यांना लाथ मारली. त्यामुळे तोल जाऊन ते जवळच असलेल्या विहिरीत पडले़ विहिराच्या कठड्यांचा मार बसल्याने ते जखमी झाले़
ग्रामस्थांनी त्यांना विहिरीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले़ प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्री नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़

Web Title: The death of the officer due to the crushing of buffaloes, got drunk in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.