नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात दर दीड दिवसाआड जातोय एकाचा प्राण
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: February 8, 2018 12:45 IST2018-02-08T12:45:17+5:302018-02-08T12:45:51+5:30

नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात दर दीड दिवसाआड जातोय एकाचा प्राण
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह्यात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आह़े त्यामुळे हे आकडे संवेदनशिल व्यक्तींचे नक्कीच लक्ष विचलीत करणारे ठरत आहेत़ प्रशासकीय कार्यतत्परतेला वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीची जोड मिळाल्यास अपघातांच्या मालिकांना नक्कीच ‘स्पीडब्रेकर’ निर्माण होऊ शकतो़ जिल्ह्यात रोजच छोटय़ा-मोठय़ा अपघातांच्या घटना घडत आह़े ही बाब अत्यंत चिंताजनक आह़े कारण गेल्या चार वर्षात तब्बल 652 जणांचा या भिषण अपघातात मृत्यू झाला आह़े विशेष म्हणजे 2016 मध्ये सर्वाधिक म्हणजे 623 अपघातांच्या घटना घडल्या आहेत़ यातील ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातांची संख्या ही 154 असून त्यात तब्बल 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले आह़े रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या चार वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झाल्या दिसून येत आह़े गेल्या चार वर्षात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यामध्ये शेकडो जण जखमीही झालेत आहेत़
गेल्या काही वर्षामध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आह़े याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आह़े शहरी भागासह ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आह़े त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की. अशीच दिसून येत आह़े दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आह़े जिल्ह्यातील पुलांची पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आह़े त्यामुळे अशा पुलांचे सव्रेक्षण करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आह़े याबाबत ऑडीट होणे अपेक्षीत आह़े जिल्ह्यातील अपघातांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या चारही प्रशासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय साधत रस्ते अपघात रोखण्यासाठी व बचाव कार्यासाठी संयुक्त मोहिम राबवावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
दरम्यान, सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होत असतात़ त्यामुळे यावर काही तरी दुरगामी परिणामकारक ठरेल अशी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आह़े महामार्गावर अनेक ‘डेड स्पॉट’ आहेत़ पोलीस प्रशासनाकडून प्रामुख्याने नवापूर जवळील कळवन, वावद तसेच ठाणेपाडा हे तिन ‘डेड स्पॉट’ जाहीर करण्यात आले आह़े या तीन ठिकाणी सर्वाधिक अपघाती मृत्यूची संख्या वाढली आह़े
महामार्गावर ‘एचएसपी’ म्हणजेच ‘हायवे सेफ्टी पेट्रोल’ विभागाकडून पेट्रोलिंग करण्यात येत असत़े आवश्यक त्या ठिकाणी ‘रिफ्लेक्टर’देखील बसविण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आह़े अपघातावर आळा घालण्यासाठी सामाजिक बांधकाम विभागाशीही समन्वय साधला जात आह़े