नंदुरबार तालुक्यात पपई झाडांवर ‘मर’

By admin | Published: April 7, 2017 02:06 PM2017-04-07T14:06:58+5:302017-04-07T14:06:58+5:30

नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़

'Death' on papaya plants in Nandurbar taluka | नंदुरबार तालुक्यात पपई झाडांवर ‘मर’

नंदुरबार तालुक्यात पपई झाडांवर ‘मर’

Next

नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे व कलमाडी परिसरात पाणीपातळी खालावल्याने पपई झाडावर मर रोगाची लागण झाली आह़े यामुळे ब:याच शेतक:यांच्या हातात शेवटच्या पपईचे उत्पादन न आल्याने नुकसान झाले आह़े
नंदुरबार तालुक्यात वाढलेले तापमान आणि पाण्याची कमरतरता यामुळे पपईची झाडे जागोजागी कोरडी होऊन पपईही पूर्णपणे कोरडी झाली होती़ अनेक शेतक:यांनी शेतातील पपई तशीच सोडून दिली आह़े मार्चच्या मध्यापासून ऊन वाढत असल्याने अनेक ठिकाणी विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी खालावली होती़ यातच तापमान वाढल्याने पपईच्या झाडांची पाने गळून गेली होती़ गळालेल्या या पानांमुळे पपई झाडावर सुकून गेल्याचे चित्र आह़े उमर्दे, भालेर, कलमाडी, काकर्दे तसेच नंदुरबार शहरालगतच्या विविध गावांमध्ये ही समस्या आह़े या समस्येमुळे अनेक शेतक:यांना मोठा फटका बसला आह़े
 60 टक्के पपई उत्पादन खराब
शेतातच मर होऊन खराब झालेल्या पपईची खरेदी व्यापा:यांकडून करण्यात आल्याची माहिती आह़े काही व्यापा:यांनी गाडय़ा भरण्यापूर्वीच पपई खराब झाल्याने समस्या निर्माण झाली आह़े यंदा पपई सुरूवातीपासूनच खाली आल्याने शेतक:यांना अडचण जाणवत होती़ त्यानंतर आता पपईचे उत्पादनच संपल्याने शेतक:यांना भरपाई देण्याची मागणी आह़े
नंदुरबार तालुक्यात साधारण यंदा 400 हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या पपईपैकी 100 हेक्टर पपई ही उमर्दे, भालेर परिसरातील असल्याची माहिती आह़े यातील 60 टक्के पपई खराब झाली आह़े

Web Title: 'Death' on papaya plants in Nandurbar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.