नंदुरबारात स्वच्छ सव्र्हेक्षणाच्या कार्यशाळेत वाद-विवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:44 PM2018-01-04T12:44:27+5:302018-01-04T12:44:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत पालिकेने घेतलेल्या कार्यशाळेत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी केले.
स्वच्छ भारत, स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत बुधवारी नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कार्यशाळेचे संचालक डॉ.उदय टेकाळे, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, मुख्याधिकारी गणेश गिरी, राहुल वाघ, डॉ.अजरून लालचंदाणी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत स्वच्छ सव्र्हेक्षण करणेकामी प्रश्नांची माहिती व नगरपरिषदेने केलेल्या कार्यवाहीबाबत नगरसेवक, सेवाभावी संस्था, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नागरिकांना यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबत सजग असले पाहिजे. पालिकेने देखील सर्वच भागात नियमित स्वच्छता होईल यादृष्टीने लक्ष दिले पाहिजे अशा सुचना केल्या.
उदय टेकाळे यांनी स्वच्छ सव्र्हेक्षणासंदर्भातील माहिती दिली. याची तपासणी करतांना स्वच्छता विभागामार्फत पुरविण्यात येणा:या सेवांची कागदोपत्री तपासणी, तसेच प्रत्यक्षात फिल्डवर जावून पहाणी, नागरिकांचा प्रतिसाद अशा तीन भागात सव्र्हेक्षण केले जाणार असल्याचे सांगितले.
नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वानी प्रय} करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, कार्यशाळेत स्वच्छता सव्र्हेक्षणाबाबतची प्रश्नावली आणि त्याचे उत्तर याबाबत माहिती वाचून दाखविण्यात येत होती. त्यावर भाजपचे नगरपालिकेतील प्रतोद प्रवीण चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी मनोगत व्यक्त करू देण्याची मागणी केली. त्यावरून वादविवाद झाला. वाद वाढत चालल्याचे पाहून कार्यशाळा आटोपती घेण्यात आली. विरोधी पक्षाचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेविका संगिता सोनवणे यांनीदेखील काही बाबींवर आक्षेप घेतला.
याबाबत प्रवीण चौधरी यांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले, स्वच्छ सव्र्हेक्षण करतांना वास्तव बाजू पुढे आली पाहिजे. अनेक भागात आजही अस्वच्छता आहे. अनेक ठिकाणी वेळेवर कचरा उचलला जात नाही. उघडय़ावर शौचाला जावे लागते. त्यामुळे केवळ कागदोपत्री सव्र्हेक्षण न करता वास्तवातून ते झाले पाहिजे. केवळ पुरस्कार घेण्यासाठी हे अभियान नको. स्वच्छतेसंदर्भातील काही योजनांचीही चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.