डीबीटीच्या निर्णयाने पटेलवाडी वसतीगृह बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:55 PM2018-09-03T15:55:44+5:302018-09-03T15:55:51+5:30

अधिकारी कर्मचारी येत नसल्याचा दावा : सलसाडी घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता

The decision of the DBT is to make Patelwadi hostel unavailable | डीबीटीच्या निर्णयाने पटेलवाडी वसतीगृह बेवारस

डीबीटीच्या निर्णयाने पटेलवाडी वसतीगृह बेवारस

Next

नंदुरबार : शासनाने भोजन डिबीटीची योजना रेटल्याचे दुष्परिणाम आता समोर येत असून शहरातील पटेलवाडी वसतीगृह संकुल बेवारस झाले आह़े भोजन तयार करण्याची कटकट मिटल्याने येथे अधिकारी व कर्मचारीचे येत नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितल़े 
शहरातील पटेलवाडी भागात नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित 1 हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह चालवले जात़े चार इमारतीच्या या वसतीगृहात यंदा केवळ 447 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत़ उर्वरित विद्याथ्र्यानी भोजन नसल्याने प्रवेश नाकारले होत़े वसतीगृहात सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून उघडय़ा फ्यूजपेटय़ा, फरशांवर साचून असलेले पाणी अपघातांना तर पेयजल म्हणून विद्यार्थी चक्क कूपनलिकांचे पाणी घेत आहेत़ या समस्या बाहेर मांडणा:या विद्याथ्र्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही येथील विद्याथ्र्यानी सांगितल़े आठवी ते पदव्युत्तर वर्गार्पयत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यासाठी सर्वाधिक सोयीचे वसतीगृह असल्याने याठिकाणी दरवर्षी जुलैमहिन्याअखेरीस प्रवेश पूर्ण होत होत़े यंदा भोजनडीबीटी बंद झाल्याने केवळ 447 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले आहेत़ विशेष म्हणजे यात केवळ 172 विद्यार्थी हे नवीन आहेत़ भोजन डिबीटी बंद झाल्याने अनेकांनी प्रवेश टाळले आहेत़ दुसरीकडे भोजन डिबीटी बंद झाली असली तरी उर्वरित सुविधा देण्याची अपेक्षा होती़ परंतू चार वर्षापासून येथील सोलर प्लांट बंद असल्याने विद्याथ्र्याना अंघोळीला गरम पाणी मिळत नाही़ पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून दोन इमारतींमध्ये वाटॅर फिल्टर प्लांट लावले आहे होत़े यातील 1 पूर्णपणे बंद असून दुस:या फिल्टरमधून नावालाच शुद्ध पाणी मिळत आह़े यामुळे विद्यार्थी टाक्यांमध्ये साचून असलेले पाणी पित आहेत़ 
वसतीगृहात सीसीटीव्ही बसवल्याचा दावा काही दिवसांपूर्वी प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आला होता़ परंतू प्रत्यक्षात सीसीटीव्ही नावालाही नसल्याचे याठिकाणी दिसून आले आह़े विद्याथ्र्याच्या सुरक्षेबाबत येथे गंभीर अनास्था असून सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याची अपेक्षा असताना कारवाई झालेली नाही़ तब्बल सात गृहपाल, प्रत्येक इमारतीत एक शिपाई आणि एक रखवलादार यांची नियुक्ती आह़े परंतू दिवसभरात यातील एकही जण दिसून येत नाही़ यामुळे कोणीही यावे आणि भटकंती करावी अशी स्थिती येथे आह़े 
वसतीगृहाच्या आवारात पडलेला कचरा, मोकाट गुरे आणि वाढलेली झुडपे यांच्यामुळे डास मच्छरांचा प्रादुर्भाव होतो आह़ेतसेच चार इमारतींपैकी प्रत्येक इमारतीखाली असलेला फ्यूजबोर्ड सताड उघडे आहेत़ त्यावर पाणी पडत आह़े हे बोर्ड सुरू करण्याची जबाबदारी विद्याथ्र्याना देण्यात आली आह़े यात एखाद्या विद्याथ्र्याचा अपघात होण्याची शक्यता आह़े वसतीगृहाच्या आवारात लावलेल्या ट्रान्सफार्मरची फ्यूजपेटी कायम उघडी असल्याने तेथेही दुर्घटनेची भिती विद्याथ्र्यानी व्यक्त केली़ 
 

Web Title: The decision of the DBT is to make Patelwadi hostel unavailable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.