पेट्रोल पाईपलाईनचे काम तुर्त बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:30 PM2019-11-30T13:30:55+5:302019-11-30T13:31:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : इंडियन ऑईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत ...

Decision to shut down petrol pipeline work immediately | पेट्रोल पाईपलाईनचे काम तुर्त बंद करण्याचा निर्णय

पेट्रोल पाईपलाईनचे काम तुर्त बंद करण्याचा निर्णय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : इंडियन ऑईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत कंपनीचे अधिकारी व शेतक:यांची  संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शेतक:यांच्या हरकती डावलून कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. यावर तोडगा निघत नसल्याने शेतक:यांचे समाधान होईर्पयत काम बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
नवापूर तहसिल कार्यालयात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, पेट्रोलीयम पाईप लाईनच्या कामासाठी आलेले इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी यांच्यात जमीन विवादावर चर्चेसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुनीता ज:हाड, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत,  कंपनीचे सक्षम अधिकारी तथा किशोर राजगुरू, कंपनीचे वरिष्ठ प्रबंधक प्रणव चौरसिया, शेतक:यांचे प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, आर. सी. गावीत, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप गावीत आदी उपस्थित होते.
शेतक:यांच्या शेतातील उभे पीक कापून इंडियन ऑइल कंपनीमार्फत अनधिकृतपणे पाईप लाईनचे काम केले जात असल्याचे आरोप करण्यात आला. शेतक:यांच्या जल, जंगल व जमीनीच्या मूळ हक्कावर गदा आणली जात आहे. शेतक:यांच्या हरकती असतांना शेतक:यांना विश्वासात न घेता कंपनी आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रय} करत असल्याचे आरोपही करण्यात आला. कंपनी आमच्या जमिनीवर इतर हक्क प्रस्थापित करु पाहत आहे, परंतु हे आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा निर्धार उपस्थित शेकडो शेतक:यांनी केला. 
कंपनीच्या वतीने वरिष्ठ प्रबंधक प्रणव चौरसिया यांनी कंपनीकडून कोणतीही दादागिरी व धमकीची भाषा वापरण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा संतप्त शेतकरी टोकाची भूमिका घेत विरोध करतील, असा इशारा गावीत यांनी दिला. आपल्या मालकीच्या जमिनीवर कुठल्याही परिस्थितीत शेतकरी काम करू देणार नाही. वेळप्रसंगी हक्कासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल असे शेवटी गावीत म्हणाले. यावर तोडगा निघत नसल्यामुळे जोर्पयत शेतक:यांचे समाधान होत नाही तोर्पयत काम बंद ठेवण्याचेकंपनीच्या अधिका:यांना सांगण्यात आले.

पेट्रोलीयम पाईपलाईनचे काम हे काही वर्षापासून प्रस्तवित होते. त्याला मंजूरी मिळाल्याने इंडियन ऑईल कंपनीमार्फत नवापूर तालुक्यातून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी कंपनीमार्फत दोन वर्षापासून कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यात काही अडथळे निर्माण झाले. त्यावर मात करीत काम मार्गी लावण्याची कार्यवाही देखील करण्यात आली. परंतु शेतक:यांमध्ये जागेच्या मबोदलाबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. सद्यस्थितीत हा वाद शिगेला पोहोचला असून शेतक:यांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनामार्फत बैठकही घेण्यात आली. परंतु त्यातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे काम तुर्त बंद करण्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. त्यामुळे शेतक:यांचे समाधान करण्यासाठी प्रय} होणार आहे. त्याला काही कालावधी लोटणार असून पेट्रोलीयम पाईपलाईनचे हे कामही पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Decision to shut down petrol pipeline work immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.