नंदुरबारात वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:26 PM2017-10-25T12:26:24+5:302017-10-25T12:26:24+5:30

महावितरणकडून धाडसत्र : दंड न भरणा:यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज

Decrease in power theft cases in Nandurbar | नंदुरबारात वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट

नंदुरबारात वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट

Next

नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली आह़े एप्रिल 2016 ते ऑक्टोबर  2017 र्पयत वीज चोरीच्या 379 घटना घडल्या आहेत़ यातून सुमारे 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़े
हीच आकडेवारी मागील वर्षी 811 इतकी होती़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा महावितरणच्या कारवाईमुळे विजचोरांवर चाप बसला असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे वीज चोरांविरोधात प्रशासनाने आपली कंबर कसली असल्याचे दिसून येत आह़े
गेल्या वर्षभरात वीज चो:यांच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही वीज वितरण कंपनीच्या पुढे चिंतेची बाब म्हणून समोर आली  होती़ जिल्ह्यात वाढत्या वीज चो:यांच्या प्रकरणांमुळे प्रशासनासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण  होत आह़े 
त्यामुळे याकडे लक्ष देत वीज वितरण कंपनीकडून वीज चोरटय़ांविरोधात धाडसत्र सुरू करण्यात आले आह़े कंपनीच्या अधिका:यांकडून वीज चोरांसंदर्भात धडक कारवाई करण्यात येत आह़े  तसेच यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आह़े 
दरम्यान, गेल्या दोन वर्षाच्या   वीज चो:यांच्या घटनांचा आलेख बघता यंदाच्या वर्षात वीज  चो:यांच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े  2014-2015 या वर्षात नंदुरबार विभागातर्फे 254 वीज चो:यांची प्रकरणे पकडण्यात आली होती़ यातील 145 ग्राहकांकडून 19 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी  वसूलही करण्यात आली होती़
तसेच 2015-2016 या आर्थिक वर्षात वीज चो:यांच्या प्रकणांमध्ये तीनपटीने वाढ होत तब्बल 811 वीज चोरीच प्रकरणे पकडण्यात आली आह़े  यातून 382 ग्राहकांकडून 25 लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ त्यामुळे वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे यातून दिसून येत आह़े  परंतु यंदाच्या आर्थिक वर्षात पुन्हा विजचोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांकडून दंड भरण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले  आह़े यातून वीजकंपनीचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े त्यावर वीज वितरण कंपनीकडून  दंड न भरणा:यांवर गुन्हे नोंदवण्याची कारवाईसुद्धा करण्यात येत आह़ेशासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये थकबाकीची वसुली करून आपापले टार्गेट पूर्ण करण्याच्या कामांना  वेग आला आह़े दररोज गावोगावी वसुलीसाठी फिरावे लागत असल्याने कर्मचा:यांची यातून मोठय़ा प्रमाणावर धावपळ होत असल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे याचा बोजा कर्मचा:यांवर पडत असून आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आह़े
 

Web Title: Decrease in power theft cases in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.