तळोद्यात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:27+5:302021-07-19T04:20:27+5:30
तळोदा : शहरातील हातोडा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण शनिवारी खासदार डॉ. हीना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. ...
तळोदा : शहरातील हातोडा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण शनिवारी खासदार डॉ. हीना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. तळोदा नगरपालिकेने शहरातील चारही दिशांना प्रवेशद्वार उभारण्याचे नियोजन केले आहे. यात शहादा रस्ता, चिनोदा रस्ता, हातोडा रस्ता व अक्कलकुंवा रस्त्याचा समावेश आहे. यातील शहादा रस्त्यावरील प्रवेशद्वार वर्षभरापूर्वी तयार झाले आहे. त्यानंतर हातोडा रस्त्यावरील कुटीर रुग्णालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नुकतेच तयार करण्यात आले. अत्यंत युद्धपातळीवर काम नगरपालिकेने केले. साडेतीन-चार महिन्यांतच काम पुरे करण्यात आले. शनिवारी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या प्रवेशद्वाराचे लोकार्पण खासदार डॉ. हीना गावित यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, धुळ्याचे नगरसेवक प्रदीप करपे, डाॅ. सुप्रिया गावित यांचा उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रा. विलास डामरे, राजेंद्र राजपूत, अनुप उदासी, प्रदीप शेंडे, नगरसेवक भास्कर मराठे, हेमलाल मगरे, रामानंद ठाकरे, सुरेश पाडवी, योगेश पाडवी, अंबिका शेंडे, सुरेश पाडवी, अमानुद्दीन शेख, जालंधर भोई, सुभाष चौधरी, गौरव वाणी, राजेंद्र पाडवी व नागरिक उपस्थित होते.
त्यापूर्वी उत्तर प्रदेशातील राम मंदिर येथे कारसेवा करणाऱ्या बारा कारसेवकांचा सत्कारदेखील नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी आपल्या गौरवाने हे कारसेवकदेखील भारावले होते. त्यानंतर रन ॲण्ड फण उपक्रमातून शाहादा रस्त्यावर साउंड सिस्टीम बसविण्यात आली होती. तिचेही उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.