ग्रामस्तरीय बाजाराचे करंजाळी येथे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:44+5:302021-09-12T04:34:44+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत यांनी केले. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्व स्पष्ट केले. तसेच रूरल हाटच्या माध्यमातून करंजाळी ...
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत यांनी केले. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्व स्पष्ट केले. तसेच रूरल हाटच्या माध्यमातून करंजाळी गावातील शेतक-यांनी शेतमाल विक्रीस शहरात न जाता गावातच विकून लाभ घेण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास काशीनाथ पाटील होते. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिलाच बाजार हाट असून याचा गावातील तसेच परिसरातील शेतक-यांना नक्कीच फायदा होईल व मॉडेल बाजार हाट निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली. कृष्णदास पाटील यांनी रूरल हाटमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना मिळून गावाची विकास प्रक्रिया गतिमान होईल, असे सांगितले.
कार्यक्रमास डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या संचालिका अर्चना वळवी, नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहतोंडे, प्रशासकीय अधिकारी अनिल पाटील, पं.स. सदस्या ललीता किसन वळवी, करंजाळीचे सरपंच किसन वळवी, पोलीस पाटील नवू वीरजी वळवी, कृषी सहायक प्रमोद पाटील, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.