दीपककुमार गुप्ताच्या कोठडीत ४ दिवस वाढ

By admin | Published: March 4, 2017 11:58 PM2017-03-04T23:58:46+5:302017-03-04T23:58:46+5:30

चौकशीत असहकार्य : उत्तर प्रदेशच्या भाजप नेत्याला धमकी दिल्याचाही संशय

Deepakkumar Gupta's custody extended for 4 days | दीपककुमार गुप्ताच्या कोठडीत ४ दिवस वाढ

दीपककुमार गुप्ताच्या कोठडीत ४ दिवस वाढ

Next

हादा : नगरपालिकेच्या निवडणुकीतील उणे-दुणे काढून माजी नगरसेवकांसह पाच जणांनी फिर्यादीस घरी बोलावून लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शहाद्यात शुक्रवारी घडली. या घटनेबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, यातील दोन जणांविरोधात प्रांताधिकारी कार्यालयात हद्दपारीची नोटीस प्रलंबित आहे.
पोलीस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार, फिर्यादी वसीम शेख अख्तर तेली (२८) रा. गौसियानगर खेतिया रोड शहादा हा एका खासगी दुकानात मजुरीचे काम करतो. नुकत्याच नगरपालिका निवडणुकीत त्याचा मित्र वाहिद रशिद पिंजारी याचा त्याने प्रचार केला़ त्यात त्याचा विजय झाला. त्याच्या विरोधात माजी नगरसेवक शेख महेमूद शेख अहेमद उर्फ मुन्ना याला उमेदवारी मिळाली होती़ व त्यात त्याचा पराभव झाला. त्यामुळे पराभवाची आग त्या वेळेपासूनच त्याच्या मनात धगधगत होती.
१ मार्च रोजी फिर्यादी वसीम तेली हा दुपारी दुकानात काम करीत असताना मुन्ना शेख याने मंजूर शेख महेमूद यास पाठवून तुला घरी बोलावले आहे  असे सांगितले़ वसीम तेली तेथे गेला असता, त्याठिकाणी माजी नगरसेवक शेख महेमूद शेख अहमेद ऊर्फ मुन्ना सलीम शेख अहमेद, टिपू शेख मुख्तार, माजीद शेख महेमूद, मंजूर शेख महेमूद यांनी एकत्र येऊन शिवीगाळ करीत मारहाण केल्याने तो जखमी झाला. या दरम्यान फिर्यादीचे मित्र त्याच रस्त्याने जात असताना काय घडत आहे याची चौकशी  करण्यासाठी गेले असता वसीम यास मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यास जखमी अवस्थेत शहादा नगरपालिकेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान फिर्यादी वसीमने म्हटले आहे की, आरोपी माजी नगरसेवक मुन्ना शेख यांच्या निवडणुकीतील पराभवाचा रोष माझ्यावर काढून मला व कुटुंबास जीवे ठार मारण्याची धमकी  दिली आहे. या घटनेबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर करीत आहेत.
दरम्यान, शहादा पालिकेची निवडणूक होऊन तीन महिने होण्यात आले तरी अद्यापही त्याचे कवित्व सुरूच आहेत. अने

Web Title: Deepakkumar Gupta's custody extended for 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.