जिल्ह्यात ९ हजार टन युरियाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:50 PM2020-07-23T12:50:59+5:302020-07-23T12:51:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वाहतूकीची अडचण असल्याने जिल्ह्याला होणारा खत पुरवठा विस्कळीत झाला आहे़ ...

Deficit of 9000 tons of urea in the district | जिल्ह्यात ९ हजार टन युरियाची तूट

जिल्ह्यात ९ हजार टन युरियाची तूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वाहतूकीची अडचण असल्याने जिल्ह्याला होणारा खत पुरवठा विस्कळीत झाला आहे़ यातून आजअखेरीस मागणी केलेल्या खताच्या तुलनेत ९ हजार टन खताची तूट निर्माण झाली आहे़ ही तूट येत्या १५ दिवसात भरुन न निघाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे़
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात दोन लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या होणार असल्याचा अंदाज आहे़ यासाठी १ लाख १८ हजार टन खताची मागणी कृषी विभागाने केली होती़ या मागणीनुसार ९८ हजार टन खत कृषी संचालनालयाकडून मंजूर करण्यात आले होते़ जून ते सप्टेंबर या काळात हे खत वेळोवेळी मिळणे अपेक्षित होते़ परंतू जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून खतांचा तुटवडा असून आजअखेरीस केवळ २५ टन खतांचा पुरवठा झाला असून अद्यापही ९ हजार टन खताची आवश्यकता आहे़
दरम्यान पावसाने सर्व तालुक्यात सरासरी हजेरी लावली असल्याने पेरण्यांचा वेग कायम आहे़ येत्या काळात दमदार पाऊस येईल या अपेक्षेतून या पेरण्या सुरू आहेत़ यातून जिल्ह्यात आजअखेरीस २ लाख ३० हजार हेक्टरच्यापुढे पेरण्या झाल्या आहेत़ पेरणी केलेल्या पिकांना युरियाची मात्रा देणे गरजेचे असल्याने शेतकरी तालुकामुख्यालय किंवा गावातील खत विक्रेत्याकडे हजेरी लावत असून खताच्या तुटवड्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत असल्याचे चित्र अद्याही कायम आहे़ कृषी विभागाकडे पुरवठा करणाºया सातपैकी पाच युरिया उत्पादक कंपन्यांनी सुमारे २५ हजार ५०० टन खतांचा पुरवठा केला आहे़ परंतु मागणीनुसार अद्यापही आठ हजार खताचा पुरवठा होणे गरजेचे आहे़ शेतकºयांना दुसºया आणि तिसºया टप्प्यात खतांची आवश्यकता असल्याने त्यांच्याकडून कृषी केंद्रांवर गर्दी वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिसून येत आहे़
कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी ७० हजार २६० टन युरिया, ७ हजार ८५० टन डीएपी, ७ हजार ८४० टन एमओपी, ११ हजार ५०० टन एसएसपी तर २० हजार ७१० टन मिश्र खतांची मागणी केली होती़ या मागणीवर ४७ हजार ३०० टन यूरीया, ५ हजार २०० डीएपी, ९ हजार ८०० एमओपी, १७ हजार १५० एसएसपी तर १९ हजार ४८० टन मिश्र खते मंजूर करण्यात आली होती़ हे खत जिल्ह्याच्या वाट्याला जून आणि जुलै महिन्यात येण्याची अपेक्षा होती़ परंतू जुलै संपण्यात येऊन यातील मिश्र खत वगळता युरियाचा पूर्णपणे पुरवठा झालेला नाही़

जुलै अखेर जिल्ह्यात ३२ हजार ६३७ टन युरिया लागत असल्याने कृषी विभागाने खत कंपन्यांकडून तशी मागणी नोंदवली होती़ परंतु प्रत्यक्षात आजअखेरीस २२ हजार ९८६ टन युरियाचा पुरवठा करण्यात आला़ दोंडाईचा येथे आलेले रॅक टप्प्याटप्प्याने उतरवले जात होते़ आजअखेरीस ९ हजार ६५१ टन युरियाची जिल्ह्यातील शेतकºयांना गरज आहे़ हा युरिया मिळण्यास विलंब होत असल्याने तालुका मुख्यालयी असलेल्या कृषी सेवा केंद्र, खरेदी विक्री संघ याठिकाणी खत घेण्यासाठी गर्दी होत आहे़ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगारांची घटलेली संख्या खत पुरवठ्यात अडचणी आणत असल्याचे कंपन्या सांगत आहेत़ कृषी विभाग कंपन्याकडे सातत्याने खतासाठी पाठपुरावा करत असून लवकरच खताचा पुरवठा होईल अशी माहिती देण्यात आली आहे़

खत उत्पादक कंपन्यांकडून देण्यात येणाºया रॅकमधून कमी प्रमाणात खताचा पुरवठा होत आहे़ तालुकानिहाय खतांची टंचाई असली तरी योग्य पद्धतीने नियमन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ खतांची आवक झाल्यानंतर तातडीने त्यांचा पुरवठा करण्यात येईल यासाठी कृषी विभागाकडून अधिकारी नियुक्त करणयात आले आहेत़
-पी़एस़लाटे, कृषी विकास अधिकारी, नंदुरबाऱ

Web Title: Deficit of 9000 tons of urea in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.