रेल्वे प्रवाशांसाठी सुविधांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:19 PM2019-07-06T12:19:12+5:302019-07-06T12:19:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वेस्थानकावर तसेच परिसरात प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी नंदुरबार रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेल्वेस्थानकावर तसेच परिसरात प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी नंदुरबार रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली़ गुरुवारी ही बैठक घेण्यात आली़
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड़ गेहलोत हे होत़े यावेळी सल्लागार जवाहरलाल जैन, सदानंद रघुवंशी, मनीष पटेल, स्टेशन मास्टर दीपक पटेल, राजकुमार, प्रमोद ठाकुर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होत़े
बैठकीत जवाहरलाल जैन यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरतकडे जाणा:या दिशेला पादचारी पुलाची उभारणी होऊन हा पुल पलीकडे खान्देश आईस फॅक्टरीच्या बाजूने बाहेर काढवा असे सूचवल़े
बैठकीत उपस्थित सदस्यांनी नंदुरबार रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 3 या ठिकाणी लिफ्ट किंवा स्वयंचलित पाय:या तयार द्याव्यात, नळवे रस्त्यावरील दुसरा रेल्वे बोगदा तातडीने पुर्ण करण्यात यावा, सद्यस्थितीत असलेल्या बोगद्यातून जाणा:या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीत विक्री परवाना नसलेल्या विक्रेत्यांकडील आरोग्यास अपायकारक ठरणा:या खाद्य पदार्थावर बंदी आणून कारवाई करण्यात यावी, नंदुरबार स्थानकाच्या बाहेर दर्शनी भागात स्वागत कमान उभारण्यात यावी, वेग वाढल्याने उधना आणि पाळधी स्थानकात वेळेपूर्वी पोहोचणा:या रेल्वेगाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात यावा, प्लॅटफॉर्म 2 आणि 3 वर शेड तयार करण्यात यावे यासह इतर मागण्या रेल्वेस्थानक प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या़
प्रशासनाने उपस्थित असलेल्या सदस्यांसोबत चर्चा करुन मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिल़े