अक्कलकुवा ग्रामपंचायतीतून मिठ्याफळीचे विभाजन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:33 AM2021-09-26T04:33:07+5:302021-09-26T04:33:07+5:30
निवेदनात, अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त आहे. यामुळे मिठ्याफळी येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कामांसाठी अक्कलकुवा येथे पायपीट ...
निवेदनात, अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त आहे. यामुळे मिठ्याफळी येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कामांसाठी अक्कलकुवा येथे पायपीट करीत यावे लागते. ग्रामपंचायतीची कामे एका फेऱ्यात कधीच पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीला वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे मजुरी करणाऱ्यांचे हाल होऊन रोजगारही बुडतो. अक्कलकुवा शहराजवळ असले तरी अनेक वर्षांपासून मिठ्याफळी गाव हे विकासापासून वंचित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार मिठ्याफळी गावाची लोकसंख्या ९२७ आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या हितासाठी व गावाच्या विकासासाठी ९२७ ही लोकसंख्या पुरेशी आहे. यामुळे मिठ्याफळी ग्रामपंचायतीची निर्मिती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर मिठ्याफळी येथील दिलीप पाडवी, हिरालाल पाडवी, अमरसिंग वळवी, भांगा वळवी, गणेश वळवी, ईश्वर वळवी, कविता वळवी, मोहम्मद आमीन हनिफ, कलीम मक्राणी, इलियास शेख, जहीर अहमद मक्राणी यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.