नाभिक कारागीरांना आर्थिक मदतीची निवेदनाद्वारे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:51 PM2020-04-22T12:51:49+5:302020-04-22T12:51:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळात सलून व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांचे उत्पन्न बंद झाले आहे. शासनाने नाभिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊन काळात सलून व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांचे उत्पन्न बंद झाले आहे. शासनाने नाभिक समाजास आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन महाराष्टÑ नाभिक महामंडळाच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनो विषाणूच्या महामारीमुळे राज्यात एक महिन्यापासून पूर्ण लॉकडाऊन आहे. त्यामुळे नाभिक समाजातील कारागीर उत्पन्न नसल्यामुळे संकटात सापडले आहेत. त्यासाठी नाभिक समाजास शासनाने मदत करणे गरजेचे आहे. संपूर्ण नाभिक व्यावसायिक कारागीर यांना वैद्यकीय सेवेत जसे सुरक्षिंत कीट, चष्मा, हॅण्डग्लोवहज, ड्रेस दिला जातो तशा सुविधा पुरविण्याची व्यवस्था करावी, ५० लाखाचा विमा उतरवावा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, सचिव अरविंद निकम, सहसचिव शिवाजी मिस्तरी, सल्लागार पी.टी. सोनवणे, प्रभाकर चित्ते, कोषाध्यक्ष छगन भदाणे, उपाध्यक्ष गजेंद्र जाधव, हिमांशू बोरसे, संचालक नितीन मंडलिक, विजय सैंदाणे, विजय सोनवणे, सुधीर निकम, प्रकाश देवरे, शशिकला सोनवणे, अनिल भदाणे आदींच्या सह्या आहेत.