दामळदा ग्रामस्थांनी केला 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:12 PM2019-03-23T12:12:54+5:302019-03-23T12:13:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता ...

Demand for Planting 50,000 trees by Damalada villagers | दामळदा ग्रामस्थांनी केला 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

दामळदा ग्रामस्थांनी केला 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता जलदिनाचे औचित्य साधून गावातून भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाकरीत ग्रामस्थांनी 50 हजार वृक्ष लावण्याच्या संकल्प केला.                              
शहादा तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण व तलावासह बंधारे डिसेंबर महिन्यातच कोरडे होऊ लागलेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने कूपनलिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बागायत शेतीच्या प्रमाणातही घटत होत आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणा:या पाण्याचे हे दुर्भिक्ष जाणवत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होत आहे. उन्हाळ्यात येथील तापमान उच्चांक गाठणारा असून, 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान मे महिन्यार्पयत राहणार असल्याने त्याची झळ नागरिकांना पोहोचणार आहे. दामळदा येथ ‘चला कामाला लागुया’ पान लोटचे काम करूया, माती आडवा पाणी जिरवा याप्रमाणे ग्रामपंचायत व पाणी फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहण्याकरिता गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
ग्रामपंचायत सरपंच हरेरामाकृष्ण मालचे, उपसरपंच डॉ.विजय नामदेव चौधरी, माजी पोलीस पाटील प्रवीण मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत सजन पाटील, तुंबा मकरंद पाटील, शहीद भगतसिंग गणेश मंडळाचे भरत महाजन, रंजना  पाटील, द्वारकाबाई माळी, मुख्याध्यापिका मनीषा पाटील,  करुणा पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, ग्रामसेवक आर.एस.रांगणगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद गावातील लहान मुलांपासून वृद्ध माणसांर्पयत सर्वानी पर्यावरण रॅलीत सहभाग नोंदवला आहे. गावातील 
महादेव मंदिर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने जल दिवसाचे अवचित्त साधून पर्यावरण बचाव रॅलीमध्ये ेग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाणी आडवा, पाणी जिरवा बाबत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामस्थांच्या प्रत्येक कुटुंबाने दोन झाडे लावावीत असा निर्धार करण्यात आला आहे. पर्यावरण टिकले तरच पाण्याची बचत होईल. येणा:या पावसाळ्यार्पयत  50 हजार झाडे लावण्याचा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. 
पाणी अडवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात  आले आहे. कच्चा बंधारा, पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे लोकसहभागातून तयार करण्यात येत आहे. शेतात असलेल्या पालापाचोळ्याच्या खतासाठी उपयोग करण्यात यावा तसेच गुराढोरांच्या चा:यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे असे या वेळी ठरविले.

Web Title: Demand for Planting 50,000 trees by Damalada villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.