सुसरी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:29+5:302021-09-25T04:32:29+5:30
दरम्यान या भेटीत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सुसरी धरण प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. हा लघू सिंचन प्रकल्प निधी अभावी अनेक ...
दरम्यान या भेटीत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सुसरी धरण प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. हा लघू सिंचन प्रकल्प निधी अभावी अनेक वर्षापासून रखडला आहे. परिणामी शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्नदेखील कायम आहे. सदर प्रकल्पास पुरेसा निधी प्राप्त झाला तर प्रकल्प लवकर पूर्ण करता येईल जेणे करून शेतकऱ्यांच्या जमिनीस मुबलक पाणी मिळेल. शिवाय प्रकल्पात अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली येईल. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. सिंचन प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती उदेसिंग पाडवी यांनी केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रामराव आघाडे,
ज्येष्ठ कार्यकर्ते केसरसिंग क्षत्रिय, नज्जू खाटीक, डॉ. तुषार संनसे, शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भरत चौधरी, युवा कार्यकर्ता संदीप परदेशी, माजी नगरसेवक गणेश पाडवी, भट्या पाडवी, महेंद्र पोटे, राहुल पाडवी, गणेश राणे, बिलाल मिया जहागीरदार, धर्मराज पवार, संदीप वळवी आदी उपस्थित होते.