अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडे 42 कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:45 AM2019-10-10T11:45:28+5:302019-10-10T11:45:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 ...

Demand for Rs 42 crore to compensate for the loss of rain | अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडे 42 कोटी रुपयांची मागणी

अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडे 42 कोटी रुपयांची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 कोटी रुपये देण्याची मागणी प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आह़े सोमवारी या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडून पाठवण्यात आले आह़े 
जिल्ह्यात यंदा कोसळलेल्या पावसामुळे कोरड, बागायती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आह़े नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी केले होत़े यात कोरड क्षेत्रात 14 हजार 481 शेतक:यांच्या 6 हजार 723 हेक्टर शेतीचे 13 कोटी 71 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होत़े बागायत क्षेत्रात 11 हजार 285 शेतक:यांच्या 7 हजार 85 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून शेतक:यांना 28 कोटी 69 लाख रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले होत़े तर शहादा तालुक्यातील एका फळबागायतदाराच्या 9 हेक्टर क्षेत्रातील 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आह़े या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीबाबत सुरु असलेला गोंधळ पूर्ण झाल्याचे सांगून हा अहवाल विभागीय आयुक्त यांना देत शासनाकडून शेतक:यांना नुकसानभरपाई म्हणून 42 कोटी 45 लाख 53 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आह़े तूर्तास विभागीय स्तरावर असलेल्या या प्रस्तावाला मंजूरी मिळणार असल्याची अपेक्षा महसूल विभागाकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
प्रस्तावानुसार भरपाईची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतक:यांच्या खात्यावर देण्याचे नियोजन करण्यात आले आह़े यासाठी पंचनामे सुरु असतानाच तलाठींकडून नुकसानग्रस्त शेतक:यांकडून बँक खाते माहिती भरुन घेत इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े मागणीचा प्रस्ताव सादर झाल्याने येत्या काळात होणा:या पुढील कारवाईकडे शेतक:यांचे लक्ष लागले आह़े 
 

Web Title: Demand for Rs 42 crore to compensate for the loss of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.