शहाद्यातील महिला सुरक्षेबाबत उपाय योजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 06:49 PM2018-03-03T18:49:23+5:302018-03-03T18:49:23+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 3 : शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आह़े महिलांच्या सुरक्षिततेता प्रश्न महत्वाचा असल्याने याची जिल्हा व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व तत्काळ उपाय योजना आखावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आह़े
याबाबत शिवसेना नेते, माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, गेल्या काही दिवसांमध्ये शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आह़े येथील युवती स्वताला सुरक्षित मानत नसल्याची स्थिती आह़े येथील विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी प्रवास करीत असतात़ परंतु दिवसेंदिवस युवतींच्या छेडखानीच्या प्रकारात वाढ झाली आह़े त्यामुळे यासर्वाचा विचार करता पोलीस प्रशासनाकडून महिला पोलीस कर्मचा:यांचे पथक नेमावे, शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी या वेळी करण्यात आली आह़े निवेदनावर अनिल साळुंके, जगदीश शिंदे, प्रवीण चौधरी आदींच्या स्वाक्ष:या आह़े