नवापूरला जलद गाडय़ांना थांबा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:28 PM2018-02-18T12:28:30+5:302018-02-18T12:28:30+5:30
‘डीआरएम’ गुप्तांकडे मांडले गा:हाणे : प्रवाशांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 18 : नवापूर स्थानकावर जलद प्रवाशी गाडय़ांना थांबा द्यावा या मागणीवर ठोस आश्वासन न मिळाल्याने नवापूरातील लोकप्रतिनिधींसह प्रवाशांचा हिरमोड झाला.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोककुमार गुप्ता व विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी नवापूर स्थानकावर वार्षिक तपासणीसाठी अधिका:यांच्या लवाजमासह शुक्रवारी भेट दिली. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. सर्व राजकीय पक्षांसह प्रवासी संघटना, व्यापारी असोसिएशन व प्रवाशांकडून गुप्ता यांच्याकडे नवापूर रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद रेल्वे गाडय़ांना थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावर गुप्ता काही सकारात्मक आश्वासन देतील अशी अपेक्षा होती़ परंतु तसे झाले नाही़
नवापूर रेल्वेस्थानकात लोहमार्गाच्या दुहेरीकरणानंतर उभारण्यात आलेले फलाट, त्यावरील सुविधा, कार्यालय आदींची पाहणी त्यांनी केली. नगराध्यक्षा हेमलता पाटील, पालिकेचे आरोग्य सभापती विश्वास बडोगे, नगरसेवक हारुन खाटीक, आरिफभाई बलेसरिया, दर्शन पाटील, खलील खाटीक, बबीता वसावे, मंजुबेन मावची, महिमा गावीत, श्रेत्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शरद लोहार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमृत लोहार, इद्रिस टिनवाला, भाजपाचे जिल्हा चिटणीस एजाज शेख, अल्पसंख्याक जिल्हा आघाडी प्रमुख जाकीर पठाण, एमआयएमचे जिल्हा उपाध्यक्ष रऊफ शेख, प्रवासी संघटनेचे श्रीकांत पाठक, एम.एन.वसावे, अजय मेहता आदी या वेळी उपस्थित होत़े सुरत-भुसावळ लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्वास येत आह़े परंतु जलद गाडय़ांमध्ये हावडा एक्सप्रेस व ताप्ती गंगा एक्सप्रेस वगळता एकही जलद गाडी नवापूर स्थानकावर थांबत नसल्याचे उपस्थित लोकप्रतिनिधींनी गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र, गुप्ता यांच्याकडून या विषयी केवळ ‘बघू’ एवढेच उत्तर देण्यात आले. या उत्तरामुळे नवापूरकरांचा चांगलाच हिरमोड झाला. या वेळी मुख्य अभियंता एऩएस़ कुलकर्णी, स्थानक अधिक्षक रामलाल मिना, सहाय्यक स्थानक अधिक्षक कमलसिंह यांच्यासह रेल्वेचे अधिकारी,कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.