तापीचे पाणी दोन नाल्यांसह सुकळ नदीत टाकण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:11 PM2018-12-07T12:11:35+5:302018-12-07T12:11:40+5:30
नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 ...
नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 गावातील सरपंच, उपसरपंचासह शेतक:यांनी धुळे येथे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. त्यांना निवेदन देखील दिले.
नंदुरबार तालुक्यातील वावद, चौपाळे, उमर्दे, दोन्ही दहिंदुले, धामडोद, कोळदे, कठोरे, पातोंडा, होळ, राकसवाडे, घुली, पळाशी, वरूळ, खोडसगाव, लहान शहादे, शिंदे या परिसरातील सुमारे 18 गावांमधील सरपंच, उपसरपंच व शेतक:यांनी एकत्र येत जलसंपदामंत्री गिरीष महाजन व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, तापी बुराई प्रकल्पाद्वारे पाणी निंभेल, रनाळे, बलदाणे, शनिमांडळ, अमरावती प्रकल्पासह बुराई नीदत टाकले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या व दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाची मुख्य जलवाहीनी रनाळे मार्गे शनिमांडळ व बुराई नदीत जाणार आहे. वावद, चौपाळे ते कोळदे परिसरातील वावद येथून बोधीकानाला, घागरी व सुकळ नद्यांवर धरणे बांधली गेल्याने गेल्या 15 वर्षापासून नद्या मृत झाल्या आहेत.
तापी बुराई प्रकल्पाच्या मुख्य वाहिनीला रनाळे येथून उपवाहिनी वावदकडे दिल्यास केवळ तीन ते चार किलोमीटर पाईपलाईनद्वारे काठय़ादेव टेकडी र्पयत पाणी टाकता येईल. पुढील नाल्यामधून ग्रॅव्हीटीद्वारे वावदर्पयत पाणी येवून पुढील तीन्ही नद्यांमध्ये जावून चौपाळे धरण भरेल. परिणामी थेट वरील 18 गावांचा पिण्याचा पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे 35 ते 40 हजार एकर शेती विहिरीद्वारे सिंचन होवून बागायती होवू शकते.
जलसंपदामंत्री महाजन यांनी कामाबाबत सव्रेक्षण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका:यांना देवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.