उमर्देच्या पाणी योजनेची चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:12 PM2019-07-01T12:12:49+5:302019-07-01T12:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे खुर्द गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे खुर्द गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आह़े जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आह़े
निवेदनात, उमर्दे खुर्द ते खापरखेडा, वळवद अशी 10 किलोमीटर पाईपलाईन मंजूर करुन त्यासाठी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यासाठी ठेकेदार नियुक्त करुन कामाला सुरुवात केली होती़ परंतू ठेकेदाराकडून निर्धारित केलेल्या पाईपपेक्षा निकृष्ट दर्जाचे पाईप टाकून कामकाज करण्यात आल़े पाईपलाईनसाठी केवळ दोन फूट खड्डा खोदल्याने जागोजागी पाईप वर आले आहेत़ या प्रकाराची प्रशासनाने दखल घेत कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा गुलाब मराठे व ग्रामस्थांकडून देण्यात आला आह़े