शेतक:यांच्या मागण्यांसाठी शहाद्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:47 PM2018-10-17T12:47:37+5:302018-10-17T12:47:42+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेना : तहसीलदारांना निवेदन सादर
शहादा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी शहरातील स्टेट बँक चौक शहादा येथून मोर्चा काढत तहसीलदार मनोज खैरनार यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मोर्चात मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जयस्वाल, तालुकाध्यक्ष मदन पावरा, अशोक पाटील, गोसा खर्डे, सुधीर पावरा, मायाबाई पवार, मंजुळाबाई पाडवी, संजय पाटील, फत्तेसिंग भिल, राज्या पावरा, छगन तडवी, भिमसिंग ठाकरे, फरीदा खान, किरण खर्डे, सचिन खर्डे, विजय वळवी, कल्लू जयस्वाल, दिलीप वाघ, निवास वळवी, राजाराम तडवी, दिवान तडवी, रमेश तडवी, केशव पटले, किरता वळवीसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी जयस्वाल यांनी प्रशासन व शेतक:यांना मागण्या वाचून दाखवत राज्य आणि केंद्र शासनाने शेतक:यांची फसवणूक केली असून, खोटे बोलून सत्तेत आल्याचे सांगितले.
आंदोलनामुळे पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांनी कर्मचा:यांसह चोख बंदोबस्त ठेवला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या शेतक:यांची सरसकट कजर्माफी करून त्यांचा 7/12 कोरा करावा, बोंडअळीमुळे शेतक:यांचे नुकसान झाले असून, त्यांना त्वरित भरपाई मिळावी, शेतक:यांना आठऐवजी 12 तास शेतीसाठी वीजपुरवठा करावा, तालुक्यातील म्हसावद, कन्साई, नवागाव, फत्तेपूर आदी गावांमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत सिंचनाची कामे करावीत, तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्पांचे व अपूर्ण असलेले पाटचा:याचे काम सुरू करावे, खतांच्या किमती वाढल्या असून, त्या कामी कराव्या आदी मागण्यांचा समावेश आहे.