शहाद्यातील यशोधन कॉलनीत झाड तोडीप्रकरणी चौकशी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 02:21 PM2019-11-30T14:21:31+5:302019-11-30T14:22:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील दोंडाईचा रोड परिसरातील यशोधन कॉलनी, कृषी नगर परिसरात इंग्रजी चिंचेचा डेरेदार वृक्ष अज्ञात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील दोंडाईचा रोड परिसरातील यशोधन कॉलनी, कृषी नगर परिसरात इंग्रजी चिंचेचा डेरेदार वृक्ष अज्ञात वाहनाची धडक देऊन पाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आह़े या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी असून नागरिकांनी याबाबत वनविभागाला निवेदन दिले आह़े
यशोधन कॉलनी च्या बस थांब्याजवळ निवारा व सावलीसाठी चिंचेचे झाड होत़े किमान 30 वर्ष वयाचे हे झाडे सुस्थितीत होत़े दरम्यान जातीचे हिरवेगार, डेरेदार वृक्ष होते. या वृक्षाला एमएच 18 बीए 0551 या वाहनाने मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धडक दिल्याने झाड पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े दरम्यान झाड पडले किंवा पाडले गेले याबाबत चर्चा सुरु होती़ झाडाच्या मागील बाजूस असलेल्या व्यावसायिक संकुलास झाडाचा अडथळा होत असल्याने ते पाडले गेल्याने योग्य ती चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आह़े हे निवेदन पोलीस प्रशासन व वनविभाग यांना देण्यात आले आह़े झाड कोणी व कशासाठी तोडले याची चौकशी करून संबंधितावर वन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आऱएम़ जाधव, मनु पटेल, संतोष वाडीले, ज़ेबी़खेडकर, विलास पटेल, डॉ. सचिन पाटील, मनोज खैरनार, नंदकिशोर सिसोदिया, एम़आऱकोळी, संजय बागुल, संजय निकुंभ यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत़