सातपुडय़ातील पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:04 PM2019-05-26T12:04:10+5:302019-05-26T12:04:16+5:30

किशोर मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ातील आदिवासी संस्कृती द:याखो:यातील निसर्ग रक्षणाच्या जाणीव जागृतीसाठी सातपुडय़ातील जीवन दर्शन ...

Demonstration of traditional items of Satpurad | सातपुडय़ातील पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन

सातपुडय़ातील पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन

googlenewsNext

किशोर मराठे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुडय़ातील आदिवासी संस्कृती द:याखो:यातील निसर्ग रक्षणाच्या जाणीव जागृतीसाठी सातपुडय़ातील जीवन दर्शन व प्रदर्शनाच्या महोत्सवात पारंपरिक वस्तू, औषधी वनस्पती, पारंपरिक बियाणे व रानभाज्या अशा 99 विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन मोलगी येथे भरविण्यात आले.
सातपुडय़ातील जंगल हळूहळू नष्ट होत आहे. जंगलाबरोबर संस्कृती व चांगल्या प्रथा-परंपरा, सण उत्सवदेखील लोप होत चालली आहे. निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या प्रथापरंपरा जपण्यासाठी काळानुसार त्यात योग्य बदल करून त्यांची नोंदणी केली पाहिजे. ही परंपरा लोकसहभागातून निरतंर पुढे चालली पाहिजे यासाठी मोलगी येथे  सातपुडय़ातील जीवन दर्शन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरुवातीला सकाळी महिलांनी डोक्यावर पारंपरिक वस्तू ठेवून पांढ:या कापडाने बांधलेल्या टोपल्या डोक्यावर घेत अग्रस्थानी  होत्या. त्यात सहभागी नवरदेव-नवरीला खांद्यावर बसवून ढोल नृत्य, हुरपोनृत्य करीत मेनरोडने काढलेली सांस्कृतिक महारॅली आकर्षण ठरली. त्यानंतर प्रदर्शनाचे उद्घाटन याहामोगी माता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.गजानन डांगे, भाजपचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी, कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोडे, जि.प. सदस्य किरसिंग वसावे, सरपंच मनोज तडवी, दिनकर पाडवी, सरपंच रोशन पाडवी, महेश चव्हाण, भिमसिग तडवी, फत्तेसिंग वसावे, अशोक वसावे, रूषाबाई वळवी, बहादूरसिंग पाडवी, कृष्णा वसावे, सुनील राहसे उपस्थित होते 
प्रास्ताविक रामसिंग दुधल्या वळवी यांनी तर सूत्रसंचालन आपसिंग वसावे यांनी केले. डॉ.गजानन डांगे, नागेश पाडवी, किरसिंग वसावे, राजेंद्र दहातोडे आदींनी प्रदर्शनाच्या आयोजकांचे कौतुक करून सातपुडय़ाच्या द:याखो:यातील संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास संजय संगेकर, व्यवस्थापक रिता पाडवी, सहयोगिनी रमिला वसावे, माजी सभापती रूषाबाई वळवी, पोलीस पाटील रोता पाडवी, विकास गोडसे, गिरधर पाडवी, गणपत वसावे, शरद पाडवी, रायसिग पाडवी, रामा वसावे, विकास तडवी यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते. प्रदर्शनात एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला, जैविक विविधता व्यवस्थापन समित्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी, पलासखोब्रा, कृषी विज्ञान केंद्र कोळदा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या राणी काजल लोकसंचलीत साधन केंद्र अककलकुवा, निर्भया महिला बचत गट मोलगी, बायफ संस्था शहादा, याहामोगी स्थानिक बियाणे संवर्धन समिती धडगाव, करहण माता स्थानिक गावरान संवर्धन समिती चोंदवाडे बुद्रुक यांनी या प्रदर्शन महोत्सवात प्रदर्शन व मांडणी करीत सहभाग नोदविला.

Web Title: Demonstration of traditional items of Satpurad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.