सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:25 PM2018-03-16T12:25:00+5:302018-03-16T12:25:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्याथ्र्याच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दोन वर्षात 50 लाखांहून अधिक दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या जाती-जमाती, अल्पसंख्याक विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. 75 टक्के उपस्थितीची अट घालून विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बंद केली गेली आहे. वसतिगृह व आश्रमशाळांमधील नित्कृष्ट भोजन, शैक्षणिक साहित्य वेळेवर न देणे या तक्रारी असून दक्षता पथक स्थापन करून चौकशीची मागणी करण्यात आली. याशिवाय इतरही विविध विषयांचा त्यात समावेश आहे. मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, किरण महिदे, विश्वजीत भामरे, नाना जगदेव, दिपक भालेराव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.